चाकूर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त जिल्हास्तरावर लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहेत. त्याचा एक भाग म्हणून चाकूर तालुकास्तरीय टी १० ग्रामीण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. चाकुर तालुक्यातुन ३० संघांनी नोंद केली आहे. शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर विलासराव देशमुख चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. तालुकाध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
कै.विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार घालुन मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मैदानावर जाऊन नाणेफेक झाली. चाकूर व तालुक्यातील गुणवंत आणि होतकरु खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून तालुकास्तवर ग्रामीण टी-टेन टेनिस बॉल स्पर्धेच्या अयोजन करण्यात आले आहे. चाकूर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर दिवस-राञ/ स्पर्धा सुरू आहेत.चापोली आणि सावली चाकुर या दोन्ही संघातील सामन्याचा नाणेफेक त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संयोजन समितीच्या वतीने सर्वच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजन केल्याबदल सर्वच संयोजन टीमचे त्यांनी अभिनंदन केले. स्पर्धेत ग्रामीण खेळाडूना प्रोत्साहन मिळाले व त्याच्यातील सूप्तगुणांना वाव मिळावा म्हणून ग्रामीण टी १० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख दिलीप पाटील, नगरसेवक भागवत फुले, निलेश देशमुख, सलीम ताबोंळी, कॉग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख पप्पू, माजी सरपंच गंगाधर केराळे, माजी प.स.सदस्य अनिल चव्हाण, अल्पसंख्याक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष शमीम कोतवाल,सेवादल दल शहर अध्यक्ष बाळु इरवाणे, राष्ट्रवादी कॉग्रेस शहर अध्यक्ष शिवशंकर हाळे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी युवक शहर अध्यक्ष बिलाल पठाण, नरंिसंग गोलावार, सजंय पाटील, बाळासाहेब भोसले, धनेश्वर विजय, सचिन चाकूरकर, सुनिल शिंदे हे उपस्थित होते. तालुक्यातुन जो संघ प्रथम क्रमांक फटकावेल त्या संघाला ५१००० रुपये पारितोषिक देण्यात येईल तर व्दितीय संघाला ३१ ००० रुपये पारितोषिक देण्यात येईल. मालीकावीर ३००० उत्कृष्ट फलंदाज ३००० उत्कृष्ट फलंदाज ३००० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रथम येणा-या संघाला जिल्हास्तरी सामान खेळण्यासाठी प्राञ ठरणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम, अटी
तालुका स्तरावर विजयी संघ हा लातूर येथे होणा-या जिल्हास्तरीय सामन्यासाठी पात्र असेल. तालुकास्तरावरील संघातील सर्व खेळाडू हेच जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी असणे आवश्यक आहे. संघातील खेळाडू बदल करता येणार नाही. तालुका व जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना स्वत:चे आधारकार्ड व सध्याचा पासपोर्ट साईज फोटो आयोजन समितीकडे देणे बंधनकारक राहील.
ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडू हा त्या तालुक्यातीलच असणे आवश्यक आहे. इतर तालुक्यातील खेळाडूंना आपला तालुका सोडून दुस-या तालुक्यातील संघात भाग घेता येणार नाही.जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी खेळाडू संदर्भात जर कोणाचे काही आक्षेप असतील तर सामना सुरू होण्यापूर्वी त्याबाबतीत संबंधीत संघाच्या कर्णधाराने आयोजकांकडे लेखी स्वरूपात कळविणे गरजेचे आहे. तालुका व जिल्हास्तरीय ग्रामीण टी-१० क्रिकेट स्पर्धेतील वेळो-वेळीबदलाचे सर्व अधिकार आयोजकांकडे असतील.