18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूररेणापूर तालुक्यात विजा कोसळल्याने जीवित हानी

रेणापूर तालुक्यात विजा कोसळल्याने जीवित हानी

एकमत ऑनलाईन

रेणापूर (सिध्दार्थ चव्हाण) : रेणापुर तालुक्यातील गव्हाण शिवारात शनिवारी दि. ९ दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात विज पडुन एका मजुर महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. असून गंभीर जखमी झालेल्या महिलेला पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच निवाडा येथील एका शेतक-याच्या बैलावर विज पडल्याने जागीच बैल मृत्यू पावला.

रेणापुर तालुक्यात सप्टेबर महिन्यात सातत्याने मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढे, नदी, नाल्याना पुर आल्याने हाताशी आलेले सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या चार पाच दिवसापासून पाऊसाने उघडीप दिल्याने शेतक-यांनी सोयाबीन काढणीसाठी मजुर मिळत नसल्याने स्थानिक सह पर जिल्हयातील मजुराकडून सोयाबीन कढणीचे काम जोरात सुरू आहे. शनिवारी दि. ९ रोजी रेणापुरसह तालुक्यात दुपारी ४.३० वाजता अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली.

गव्हाण येथील शांताबाई काशिनाथ पवार ता. रेणापूर यांच्या शेतात सोयाबीन काढणीचे काम सुरू असताना अचानक वीज पडल्याने उज्वल्ला नागनाथ खपराळे (वय ४० वर्षे) रा. शेळवली ता. देगलूर जिल्हा नांदेड या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुन्नाबाई धनाजी देवकते (वय ५५ वर्षे) रा. लींगी ता. औराद जिल्हा बिदर (कर्नाटक) ही महिला गंभीर जखमी झाल्याने या महिलेला ग्रामीण रुग्णालय रेणापुर येथे उपचारासाठी दाखल केले असता येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचाराठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.डी. तांदळे यांनी दिली. तसेच निवाडा येथील दयानंद लिंबाजी कसपटे यांच्या शेतातील बैलावर विज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच मंडळ आधिकारी दिलीप देवकते, तलाठी गोविंद शिंगडे, पोलीस जमादार बाळासाहेब कन्हेरे यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. तसेच जखमी महिलेला लातुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार साळुंके, रेणापूर तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सिद्राम जाधव, समसापुरचे माजी सरपंच महादेव बरीदे यांनी परिश्रम घेतले.

घनसरगाव, रेणापुर, खरोळा बॅरेजसचे दरवाजे उघडले
रेणापुर तालुक्यात शनिवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडासह झालेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाल्याना पुर आला. या पुरांचे रस्त्यावर आल्याने काही भागातील रस्ते बंद होवुन वाहतुक ठप्प झाली होती. दरम्यान रेणापुर ते काळेवाडी, बिटरगाव कामखेडा, वाला, तत्तापुर या गावाना जाणारा मार्गावर जाणा-या रेणापुर पासुन जवळच असलेल्या ओढयाला पुर आल्याने व मोठया प्रमाणात पुरांचे पाणी रस्त्यावर आल्याने या वरील मार्गाची वाहतूक काही तास ठप्प होती. तर सोयाबीन काढणीस गेलेल्या मजुर, शेतकरी या पाण्यामुळे आडकुन पडले होते. रेणा नदीवरील घनसरगाव, रेणापुर, खरोळा येथील बॅरेजसचे दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या