22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरसोनवळकर यांना महावितरणकडून स्कूटरची लॉटरी

सोनवळकर यांना महावितरणकडून स्कूटरची लॉटरी

एकमत ऑनलाईन

निलंगा : महावितरणच्या ग्राहकांनी नियमितपणे व वेळेवर विज बिल भरणा करावे याकरिता घरगुती वीज ग्राहकांसाठी ‘वीज बिल भरा, बक्षीस मिळवा’ ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत काढण्यात आलेल्या महावितरणच्या लकी ड्रॉ स्कीम मध्ये निलंगा येथील बालाजी शंकरराव सोनवळकर यांना इलेक्ट्रीक स्कूटरची लॉटरी लागली असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता विवेकानंद स्वामी यांनी दिली.

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालय अंतर्गत येणा-या औरंगाबाद, लातूर, नांदेड , परिमंडळातील घरगुती वीज ग्राहकांसाठी वीज बिल भरा, बक्षीस मिळवा ही योजना जाहीर केली होती. या योजनेत १ जून ते ३१ ऑगस्ट २०२२ दरम्यान वीज बिल भरणा-या ग्राहकांना या योजनेत प्रत्येक महिन्याला बक्षीस ंिजकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मराठवाड्यातील १०१ उपविभागातून एक हजार रुपयांची प्रत्येकी दोन बक्षिसे, ऑनलाईन विज बिल भरणा-या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला प्रादेशिक कार्यालया पातळीवर मोबाईल हँडसेटकिंवा टॅब यासोबतच दरमहा २२ विभागातून प्रत्येक एक एका ग्राहकास एक मिक्सर ग्राइंडर , नऊ मंडळातून प्रत्येकी एक रेफ्रिजरेटर , तीन परिमंडळातून एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर इलेक्टीÑक स्कूटरचे बंपर बक्षीस दिले जाणार आहे .

या योजनेअंतर्गत १० जुलै २०२२ रोजी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयात महावितरण चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या प्रमुख उपस्थितीत लकी ड्रॉ बंपर लॉटरी काढण्यात आला. यात निलंगा येथील बालाजी शंकराव सोनवळकर यांना इलेक्ट्रीक स्कूटरची लॉटरी लागली आहे. बक्षीस विजेत्या ग्राहकाचे महावितरण लातूरचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे , अधीक्षक अभियंता मदन सांगळे, कार्यकारी अभियंता संजय पवार, उपकार्यकारी अभियंता शिवशंकर सावळे, सहाय्यक अभियंता विवेकानंद स्वामी यांनी अभिनंदन करून सर्व वीज ग्राहकांना नियमित व वेळेवर वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या