34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeलातूर'लाऊड स्पीकर'ने होतेय रब्बी ज्वारीची राखण

‘लाऊड स्पीकर’ने होतेय रब्बी ज्वारीची राखण

एकमत ऑनलाईन

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख ) : बदलत्या काळानुसार शेतकरी ही अत्याधुनिक झाला आहे. परपंरागत पाखरांपासून ज्वारीची राखण करणारी शेतक-यातील ‘गोफण’ गायब झाली असून ‘ गोफण ‘ च्या जागी ‘ मेगाफोन ‘ आला असून चार्जिंगद्वारे चालणा-या मेगाफोनमध्ये एकदा रेकॉर्डिंग केल्यानंतर सुमारे सहा तास त्यातून सलग मोठा निनाद होत असल्याने माणसाविना ज्वारीची राखणदारी होत आहे.

‘शेत आलंया राखणीला सोन्याचं घुंगरू माझ्या गोफणीला’ हे गीत म्हणत शेतकरी ज्वारीच्या पिकात चार लाकडे रोवून उभारलेल्या उंच आटोळ्यावर उभा राहत गोफण हातात घेत त्यामध्ये बारीक खडा ठेवून चौफेर मारा करीत ज्वारीवरील पक्षांना उठवायचे दिवस आता कालबा झाले आहेत.त्यामुळे शेतक-याच्या हातातील गोफण झाली गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यात भुजगावणे व माणसाविना पिकाची राखण होत असून यां मेगाफोनने ( लाऊड स्पीकर ) ने उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या वर्षी तालुक्यात सुमारे २ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीचा पेरा झाला. त्यात मुबलक पाणी व चांगल्या वातावरणामुळे ज्वारी बहरली असून आहे. या पुर्वीच्या काळात ज्वारीचे पक्षापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी शेतात भूजगावणे व तसेच लाकडी आटोळा बनवून गोफणीने ज्वारीवर दगड भिरकावून पाखरांना हुसकावून लावत असत तर काही शेतकरी डबा वाजवणे, मातीचे ढेकळ मारणे असे प्रकार करून पक्षांना पळवून लावून पिकांचे पक्षांपासून संरक्षण करीत असत. यंदा मात्र शेतक-यांनी पक्षापासून ज्वारी वाचविण्यासाठी गोफणऐवजी शेतात एक लाकूड रोवून त्यावर मेगाफोन म्हणजेच छोटा लाऊड स्पीकर बांधला आहे. चाईना असलेल्या या मेगाफोनमध्ये एकदा मोठ्या आवाजाची रेकॉर्डिंग केल्यानंतर ते सतत मोठा आवाज काढत असल्याने या आवाजामुळे पक्षी येत नसून शेतकरी यामुळे निश्चीत झाले असले तरी शेतक-यंच्या हातातील गोफण मात्र आता दिसेनाशी झाली असून पुढील पिढीला गोफण फक्त चित्राद्वारे बघण्यास मिळणार आहे

नांदेड जिल्ह्यात कोरोना वाढला ; ९० जण पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या