24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरटाकळगाव येथे पशूंना लम्पीचा शिरकाव

टाकळगाव येथे पशूंना लम्पीचा शिरकाव

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील टाकळगाव येथील एका शेतक-याच्या म्हैसीस लंम्पी त्वचारोगाची लक्षणे आढळून आले आहे. त्यामुळे शेतक-यात भितीचे वातावरण पसरले आहे. बाधीत क्षेत्रातील ५ किलोमीटर परिसरात लसीकरण मोहिम राबविली जात आहे.
रेणापूरसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. या भागातील काही शेतकरी शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात त्यामुळे गाय – म्हैसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीच्या कामासाठी बैलाचा पशुधनाचा वापर करतात.त्यामुळे ही तालुक्यात जनावरांची संख्या ब-यापैकी आहे. सध्या पावसाळा असल्याने हिरवा चारा जनावरांना मिळत असल्याने दुधाचे प्रमाणही वाढले आहे. मात्र त्यातच लंम्पी त्वचा रोगाचा राज्यात मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यासह पशुधन मालकात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान रेणापुर तालुक्यात ही या रोगाचा शिरकाव झाल्याचे आढळून आले आहे.

टाकळगाव येथील एका शेतक-याच्या म्हैशीस या रोगाची लक्षणे आढळून आल्याने शेतकरी व पशुधन मालकाव भितिचे वातावरण पसरले आहे . लक्षणे आढळून आलेल्या या म्हैसशीच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहितीपशुधन विकास अधिकारी डॉ. एच .पी .गायके यांनी दिली. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच लम्पी रोग आहे की इतर कोणता आजार याची माहिती मिळू शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या