20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeलातूरपानगाव येथे लम्पीचा दुसरा बळी

पानगाव येथे लम्पीचा दुसरा बळी

एकमत ऑनलाईन

रेणापूर : तालुक्यातील पानगाव येथे लम्पीचा दुसरा बळी गेला आहे. दोन बैलांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतक-यांच्या चिंता वाढली आहे. लम्पीमुळे पानगावात यापूर्वी एका बैलाचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी दि. ४ नोव्हेंबर रोजी पद्माकर कुलकर्णी यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. अणखी या आजाराची तीन जनावरे असल्याची चर्चा आहे.

कोवीड १९ संसर्ग, मंकीपॉक्स, स्वाईन फलू, मलेरीया आणि डेंग्यू या सारख्या समस्यांना तोंड देत असलानाच लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पी या जीवघेण्या आजाराने लक्ष्मण बाळासाहेब चव्हाण यांच्या बैलाचा बळी घेतला तर पद्माकर कुलकर्णी यांच्या एका बैलाचा ५ ऑक्टोबर रोजी लागण झाली होती. यांवर चार सुरूहोते यातच शुक्रवारी दि. ४ रोजी बैल मृत्यू पावला, अशी माहिती पानगावचे सहायक पशुधन अधिकारी जे. आर. केकाण यांनी दिली आ.हे. तर व्यंकटराव चव्हाण यांच्या बैलास लक्ष्मीची लागण झाली आहे.

याबरोबरच गोविंद मोतीपल्ले यांच्या देवणी जातीच्या गयाीच्या अंगावर लम्पीची लक्षणे दिसून आल्यामुळे तिच्यावरही उपचार सुरू आहेत. तर त्यांच्या शेजारी असलेल्या एका शेतक-यांची गाय आजारी असल्याने तिलाही लम्पीची लागण झाली असल्याची शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत.विशेष म्हणजे या सर्व जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस दिली असल्याचे शेतकरी सांत आहेत. तर येथील सहायक प.शुधन अधिका-यांनी उचार करुनही दोन बैल दगावल्याने परिसरातील पशुपालकांत चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. यामुळे जिल्हा प.शुधन विकास अधिका-यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी शेतक-यांतून केली जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या