22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरमाधवी जोधवानी इनरव्हील डिस्ट्रीक ३१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यक्षा म्हणून सन्मानित

माधवी जोधवानी इनरव्हील डिस्ट्रीक ३१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यक्षा म्हणून सन्मानित

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
इनरव्हील क्लब एरिया २४ लातूरच्या संस्थापक अध्यक्षा माधवी प्रतीक जोधवानी यांना इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट ३१३ च्या अ‍ॅन्युअल अवॉर्ड २०२१ -२२ च्या कार्यक्रमात ट्रॉफीज व २ सर्टिफिकेट्स मिळाले. हा कार्यक्रम पुणे येथे दि. ३ जुलै रोजी झाला. इनरव्हील डिस्ट्रीक ३१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अध्यक्षा म्हणून त्यांना पहिले पारितोषिक मिळाले. तसेच उत्कृष्ट समाजसेवा व क्लब वाढीसाठी केलेले भरपूर प्रयत्न उत्कृष्ठ संवाद, थीम प्रोजेक्ट अँवॉर्ड व क्लबमध्ये सर्वात जास्त नवीन मेंबर्स आणणे इत्यादी सेवा दिल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच सचिव श्रद्धा जोशी यांनाही उत्कृष्ट सचिव म्हणून सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डिस्ट्रिक्ट चेअर संतोष सिंग व डिस्ट्रिक्ट सचिव डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी ऑल इंडिया असोसिएशन च्या अध्यक्षा डा.ॅ सुरजित कौर व अश्विनी डिगोळे याही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी क्लबच्या उपाध्यक्षा रीत बुलानी, सहसचिव प्रियांका इटकर, कोषाध्यक्षा आंचल मुंदडा, आयएसओ, स्वर्णिमा कोचेटा, संचालिका प्राजक्ता पल्लोड, टीम फाउंडर ऋतूजा देशमुख व इनरव्हील क्लबच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या