25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरविलासराव देशमुख यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्यसेवेचा महायज्ञ

विलासराव देशमुख यांच्यास्मृतिदिनानिमित्त आरोग्यसेवेचा महायज्ञ

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विकासरत्न विलासराव देशमुख साहेब यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर व परीसरात इंडीयन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडीयन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ ऑगष्ट रोजी महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबीराच्या माध्यमातून जवळपास ३०० पेक्षा अधिक रुग्णालयात रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले, काही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आल्या. यासाठी रविवारी सकाळ पासनूच रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. हजारो रुग्णांना या महाआरोग्य शिबीराचा लाभ झाला आहे.

आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन
राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर येथील ओम साई पॅथॉलॉजीच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी केले तसेच येथील अत्याधुनिक लॅबची पाहणी केली. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी इंडीयन मेडीकल असोशिएशन लातूर, अध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, सचिव डॉ. मुकूंद भिसे, निमाचे डॉ. दयानंद मोटेगावकर, इंडीयन डेंटल डॉ. धनराज शितोळे, होमीओेपॅथी असोशिएशन डॉ. पुरुषोत्तम दरक या संघटनाचे सर्व पदाधिकारी त्याच बरोबर डॉ. अशोक पोद्दार, डॉ. अजय जाधव, डॉ. किणीकर, डॉ. संजय पौळ, डॉ. दिनेश नवगिरे यांच्यासह शहरातील वरीष्ठ डॉक्टर मंडळी यांनी परीश्रम घेतले आहेत.

विलासराव देशमुख फांऊडेशनच्या वतीने त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात आले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून या महाआरोग्य शिबीरात आयएमएचे, दंतवैद्यकीय, आर्युवेदीक, होमियोपॅथीक असे एकूण ३०० रुग्णालयांनी सहभागी होवून रुग्णांना सेवा दिली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून स्त्री रुग्णालय, लातूर, ग्रामिण रुग्णालय बाभळगाव, ग्रामिण रुग्णालय मुरुड, ग्रामिण रुग्णालय रेणापूर येथे स्त्रियांचे कर्करोग निदान व उपचार करण्यात आले. या महाआरोग्य शिबीरांच्या निमीत्ताने हजारोंच्या संख्येने तज्ञ डॉक्टर रुग्णसेसाठी उपलब्ध झाले. या ठिकाणी प्रयोग शाळेतील तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाच्या काही तपासणी मोफत केल्या तर काही तपासणी व उपचार सवलतीच्या दरात करण्यात आले. दुर्धर आजार असलेल्या सामान्य परिस्थितीत असलेल्या रूगणांना याचा फायदा झाला आहे. या महाआरोग्य शिबीराचा नागरीकांनी लाभ घेतला, या रूग्णांवर मोफत उपचार केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या