22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरनिराधारांच्या वतीने रखरखत्या उन्हात औसा तहसीलवर महाआक्रोश मोर्चा

निराधारांच्या वतीने रखरखत्या उन्हात औसा तहसीलवर महाआक्रोश मोर्चा

एकमत ऑनलाईन

औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यासह शहर निराधार बांधवांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा अन्यथा विशेष सहाय्य योजनेचा लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल ही शासन निर्णय दि. २० ऑगस्ट २०१९ आणि दि. १३ मे २०२१ मधील अट त्वरित रद्द करावी या मागण्यासाठी तालुक्यासह शहर निराधारांच्या वतीने रखरखत्या उन्हात औसा तहसील
कार्यालयासमोर महाआक्रोश मोर्चा आंदोलन करण्यात आले.

तालुक्यासह शहर निराधारांच्या वतीने गुरूवार दि. ५ मे रोजी सकाळी ११ वाजता किल्ला मैदान येथून तहसिल कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी निराधारांच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. या महाआक्रोश मोर्चात निराधारांना दि. २० ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयातील दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याची बंधन असलेली अट त्वरित रद्द व्हावी, दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळावे, २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ५० हजार रुपये वार्षिक करावी, शासकीय कर्मचा-यांप्रमाणे निवृत्ती वयोमर्यादा ६५ वर्षे वरून किमान ५८ वर्षे करण्यात यावे, या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून निराधारांचा महाआक्रोश मोर्चात हजारो निराधारांची उपस्थिती दर्शविली होती. यावेळी निराधारांच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्रीनां निवेदन देण्यात आले. यावेळी या निवेदनावर निराधारांची सह्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या