22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरमहाबीज, सोयाबीन बियाणे आधार कार्ड, सातबारानुसार वितरीत होणार

महाबीज, सोयाबीन बियाणे आधार कार्ड, सातबारानुसार वितरीत होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
दहा वर्षाआतील महाबीज सोयाबीन एमएएसयु-१६२, एमएसीएस-११८८, एमएसीएस-१२८१, एमएएससी-१५८ बियाणे सातबारा आधार कार्ड व अनुदान दराने उपलब्ध होणार असल्याची माहिती महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे. खरीप २०२२ हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणामध्ये महाबीज सोयाबीन एमएएसयु-१६२, एमएसीएस-११८८, एमएसीएस-१२८१, व एमएएससी-१५८ या वाणाचे बियाणे अनुदानित दराने महाबीज विक्रेत्याकडे सातबारा व आधारकार्डची झेरॉक्स देऊन बियाणे खरेदी करावेत. शेतक-याला सातबाराच्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त पाच बॅगा पर्यंत बियाणे अनुदानित दराने खरेदी करता येतील.

त्यासाठी सोयाबीन एमएएसयु-१६२, एमएसीएस-११८८,एमएसीएस-१२८१, व एमएएससी-१५८, ३० किलोची बॅगची मुळकिंमत रुपये ४ हजार २०० अनुदान रुपये १ हजार २०० वजा जाता रुपये ३ हजार प्रति ३० किलो बॅगप्रमाणे अनुदानित दराने खरेदी करावे. प्रथम येणा-यास प्रथम प्रधान्य या धर्तीवर बियाणे उपलब्ध असेपर्यंत अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लातूर व जिल्हा व्यवस्थापक महाबीज लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या