31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeलातूरऔसा शिक्षक पतसंस्थेवर महादेव खिचडेंचे वर्चस्व

औसा शिक्षक पतसंस्थेवर महादेव खिचडेंचे वर्चस्व

एकमत ऑनलाईन

औसा : प्रतिनिधी
औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन महादेव खिचडे यांच्या सेवाभावी शिक्षक सहकार पॅनलचे सर्व ११ उमेदवार विजयी झाले. औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेवर महादेव खिचडे यांनी हॅट्रिक साधली आहे. सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा करीत मतदान केंद्रापासून संस्थेच्या कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढली.

औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महादेव खिचडे यांच्या नेतृत्वाखालील सेवाभावी शिक्षक सहकार पॅनल व दयानंद बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही शिक्षक सहकार पॅनलमध्ये लढत झाली. रविवार दि १९ मार्च रोजी सकाळी ८ ते ४ यावेळी मतदान होऊन लागलीच मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत सेवाभावी शिक्षक सहकार पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले.

या निवडणुकीत विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते – सर्वसाधारण मतदारसंघातून, महादेव खिचडे (६३७ ) संजय जगताप ( ६३४) हरिष आयतबोने (५९५ ) रमेश जाधव (५४१) मते, युसूफ पिरजादे (४६२) रूकमे धीरजकुमार रुकमे (४४२) विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघातून शेळके अमोल शेळके (५७२) महिला प्रतिनिधी मतदारसंघातून संगीता कानडे (५८२) मंदाकिनी माने (५४४), इतर मागासवर्गीय मतदार संघातून मधुकर गोरे (६१८) अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून महेश कांबळे (५६०) मते घेऊन विजयी झाले. सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करीत मतदान केंद्रापासून औसा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेपर्यंत विजयी मिरवणूक काढली. सदर निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. व्ही. मसलगे यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या