34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरसिद्धेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा रद्द

सिद्धेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा रद्द

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीची ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्री यात्रा पूर्णत: रद्द करण्यात आली आहे. सोमवार दि. १ मार्च रोजी देवस्थानच्या प्रशासक तथा धर्मादाय उपायुक्त श्रीमती यु.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, विश्वस्त अशोक भोसले यांच्यासह भक्तगणांची यावेळी उपस्थिती होती.

या बैठकीत यात्रा पूर्णत: रद्द करण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त ठराविक मंडळींच्या उपस्थितीत विधिवत पूजाअर्चा मात्र होणार आहेत. शिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजाच्या वतीने केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होईल. यासाठी त्यांना पास दिले जातील. सकाळी ९.३० वाजता जिल्हाधिका-यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येईल.

त्यानंतर पाच लोकांच्या उपस्थितीतच माळी समाजाचा पुष्पाभिषेक संपन्न होईल. दरवर्षी गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठयांची मिरवणूक यावर्षी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी या काठयांचे गाभा-यातच पूजन होईल. प्रत्येकी दोन मानक-यांच्या हस्ते हे पूजन संपन्न होईल. यात्रा कालावधीत केले जाणारे भजन-कीर्तन व काकडा कोरोना विषयक नियम पाळून केवळ ११ लोकांच्या उपस्थितीत केला जाईल. शिवरात्री निमित्त दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

विदर्भ, मराठवाड्याला हक्काचा निधी मिळेल, वैधानिक मंडळाबाबतही लवकरच निर्णय – अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या