22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeलातूरअतिवृष्टी जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करा

अतिवृष्टी जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करा

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसापासुन सुर्यदर्शन झाले नाही. पावसाची संतधार चालु आहे. या पाच दिवसात सरासरी ३०७. मि.मि पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगाम धोक्यात आली आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी जाहीर करुन नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील काही भागात पेरण्या झाल्या आहेत. पण गोगलगायने पिकावर हाल्ला करुण खाऊन टाकल्यामुळे शेतक-याला मोठ्या प्रमाणत दूबार पेरणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हि एक नैसर्गिक आपत्ती आहे. काही भागात उशिरा पेरण्या झाल्यामुळे पिके लहान आहेत. त्या पिकांना अतिवृष्टीमुळे पाणी लागले आहे. तसेच नदीकाठच्या शेतक-याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामळे तेथील पिके ही धोक्यात आली आहेत. गोगलगायने सोयाबीन पीक खाऊन टाकले आसतानाही या नुकसानीची महसूल, कृषि, विमा कंपनी या पैकी कुठल्याही प्रशासनाने त्याची कसलीच दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हाअधिकारी यांनी ताबडतोब या बाबीची दखल घेऊन लातूर जिल्हा अतिवृष्टी जाहीर करावा. तसेच गोगलगायने केलेल्या नुकसानीचे सबंधीत कृषि व विमा कंपनी यांना पंचणामे करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या