24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरबालकुपोषण नष्ट करून देश बलवान करा : पृथ्वीराज

बालकुपोषण नष्ट करून देश बलवान करा : पृथ्वीराज

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
बालके सुदृढ झाली पाहिजेत. त्यासाठी महिलांनी बाल कुपोषण नष्ट करून देश बलवान बनवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले. महिला व बालकल्याण विभाग लातूर व एकात्मिक बाल विकास प्रकल्प मुरुड व लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुरुड येथे आयोजित राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी लातूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभिनव गोयल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी पोषण माह जिल्ह्यात योग्य रितीने राबविण्या संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व इतर सर्व विभागांनी पोषण माह अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामध्ये पोषण आहार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. अन्न प्राशन, पंजिकरण आदी उपक्रम देखील मान्यवरांचे हस्ते घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी तसेच मुरुड व विभागातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस व इतर महिला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाल विकास प्रकल्प अधिकारी जे. डी. माळी यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या