25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeलातूरवेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर करा - पालकमंत्री अमित देशमुख

वेळेत उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा तत्पर करा – पालकमंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कोविड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर दि. १७ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहर महानगरपालीका कार्यालयात जाऊन महानगरपालिका अधिकारी, पदाधिकारी यांची कोविड-१९ संदर्भात बैठक घेऊन नगरपालिकेकडून शहरात राबविण्यात येणा-या उपाययोजना बाबत आढावा बैठक घेतला. रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यासाठी यंत्रणा तत्पर करावी, अशी सूचना पालमंत्र्यांनी केली.

लातूर शहर महानगरपालीका कार्यालयात शनिवारी सकाळी जाऊन कोवीड-१९ रुग्णावरील उपचार आणि हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भात आढावा घेतला. यांनतर पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी यंत्रण तत्पर रहावी, हेल्पलाईनच्या माध्यमातून रुग्णांना बेड मिळवुन देण्याचे नियोजन करावे, स्ट्रेस, टेस्ट आणि स्ट्रीट मोहिम प्रभावीपणे राबवावी, मृत्युदर कमी राखण्यासाठी युध्दपातळीवरचे प्रयत्न असावेत, खाजगी प्रयोगशाळा मधील कामकाज सुनियंत्रीत करावे, लसीकरणाची मोहिम गतीमान करावी, ज्येष्ट नागरीकांच्या लसीकारणाला प्राधान्य देण्यात यावे, दुस-या प्राधान्य क्रमात प्राध्यापक, शिक्षण, पत्रकार यांचे लसीकरण करावे, महापालीका कोवीड केअर सेंटर मधील ऑक्सिजेनेटेड आणि वेंिन्टलेटर बेडची संख्या वाढवावी, महापालीकेच्या वतीने मृत व्यक्तिच्या अंत्यसंस्कारासाठी ४ हजार रूपये पर्यंत खर्च करण्यात येत आहे हे जाहीर करावे, गॅसदाहीन्या कार्यान्वित कराव्यात, भविष्यातील गरज लक्षात घेऊन शहरातील आरोग्य व्यवस्था सक्षम करावीत, दोन प्रभागासाठी १ या प्रमाणात ३० बेडची रूग्णालये उभारावीत, या ३० पैकी ५ बेड वेन्टिलेटर १५, बेड ऑक्सिजनेटेड तर १० बेड सर्वसाधारण असावेत आदी प्रकारच्या सुचना करून महापालीकेच्या या मोहिमेत सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

प्रारंभी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर मनपाकडून कोविड-१९ बाबत सुरु करण्यात आलेल्या मदत कक्षासह महापौर व विरोधी पक्ष नेत्याच्या दालनाची पाहणी केली. बैठकी दरम्यान महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर शहरातील स्मशानभूमीत सध्या असलेल्या व आवश्यकता असणा-या गॅस दाहिनी, लसीकरण करण्यासाठी आवश्यक लस पुरवठा, ऐनवेळी गंभीर रुग्णास डीपीडीसी सेंटर मधून व्हेंटिलेटर उपलब्धता बाबत माहिती दिली.

आयुक्त अमन मित्तल यांनी लातूर शहरातील गौतम नगर, प्रकाश नगर भागातील वाढती रुग्ण संख्या, गांधी मार्केट भागात रॅपिड टेस्ट सुरु करणे,
उपलब्­ध खाजगी हॉस्पिटल, येत्या काळात शहरात असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची रॅपिड टेस्ट केली जाणार, शहरातील कोविड केअर सेंटर मधील सध्याची रुग्ण संख्या व दिल्या जाणा-या आरोग्य सेवा सुविधा, ऑक्सिजन बेड संख्या, उपलब्ध ऑक्सिजन साठा या बद्दलची माहिती दिली. उपआयुक्त शशी नंदा यांनी लातूर शहरातील कोविड१९ तपासणी, रुग्ण संख्या, आर.टी.पी.सी.आर.चाचणी संख्याची माहिती दिली. उपआयुक्त मयुरा शिंदेकर यांनी शहरातील उपलब्ध लस, पूर्ण झालेले लसीकरण, लसीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल टीम बाबत माहिती दिली. यावेळी सहआयुक्त शैला टाके यांनी शहरातील आरोग्य केंद्र, बिडवे कोविड केअर सेंटरची तयारी, विनामस्क विनाकारण फिरणा-या व्यक्ती विरोधात केली जाणारी दंडात्मक कारवाईची माहिती दिली. तर क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी विनामास्क फिरणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावरील दंडात्मक कारवाई संदर्भात माहीती दिली.

या बैठकीसाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, उप महापौर चंद्रकांत बिराजदार, विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दीपक सूळ, उप आयुक्त शशीमोहन नंदा, शैला डाके, मयुरा शिंदेकर, मंजुषा गुरमे, सह आयुक्त वसुधा फड, सह आयुक्त सुंदर बोंदर, डॉ. महेश पाटील, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, संजय कुलकर्णी, समाधान सूर्यवंशी, डॉ. प्रशांत माले यांच्यासह लातूर शहरातील क्षेत्रीय अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख, पदाधिकारी उपस्थित होते.

मुंगीच्या परिश्रमाची गोष्ट “वारूळ”

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या