23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeलातूरमांजरा धरण नव्वद टक्के धरण भरले

मांजरा धरण नव्वद टक्के धरण भरले

एकमत ऑनलाईन

कळंब (सतीश टोणगे) : कळंब तालुक्यातील मांजरा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. या मुळे धनेगाव येथील मांजरा धरणाच्या पाणी पातळी मध्ये झपाट्याने वाढ होत आहे धरण नव्वद टक्के भरले आहे. तालुक्यात सर्वदूर झालेल्या मुर पावसामुळे धनविहिरी, कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

मागच्या आठ दहा दिवसापासून प्रदीर्घ विश्रातींतर पावसाने सुरवात केली आहे..बहुतांश भागात मुर पाऊस सुरू झाला .त्यामुळे विहिरी,कुनलिकेच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसामुळे शेतीची मशागतीची कामे थांबली आहेत.

तालुक्यात पावसाने पासून च हलक्या स्वरूपात हजेरी लावली.मुर पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.लातूर,अंबाजोगाई,कळंब,केज,धारूर आदी गावासाठी पाणी पुरवठा करणारे मांजरा प्रकल्प या वेळी ही पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची चिन्हे आहेत. ,कळंब तालुक्यातील बहुला,खोंदला, आथर्डी,भाटसांगवी कळंब शहराला खेटून गेलेली मांजरा नदी होय.या नदीचे उगमस्थान भूम,जामखेड,खर्डा परिसरातून झाल्याचे सांगण्यात येते.सोमवार पासून मांजरा नदी दुथडी भरून वाहत आहे.त्यामुळे मांजरा प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरण्याचे संकेत मिळत असून मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

मांजरा प्रकल्प आजची परिस्थिती.

दिनांक 14 सप्टेंबर 2021

एकूण साठा 189.789 दलघमी
उपयुक्त साठा 141.659 दलघमी
पाणी पातळी 641.53 मी

एकूण साठा 59.80%
उपयुक्त साठा. 90.05%
1/6पासून आवक 1743 दलघमी

।।।प्रकल्पीय माहिती।।।
एकूण साठा 224.09 दलघमी
उपयुक्त साठा 176.96 दलघमी
मृत साठा. 47.130 दलघमी
पूर्ण संचय पातळी 642.37

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या