23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरमांजरा धरण ४८.१७ टक्क्यांवर

मांजरा धरण ४८.१७ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या ६९६.६ मिलीमीटर पाऊस पडला असला तरी लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण अद्यापही ४८.१७ टक्क्यावरच उपयुक्त पाणीसाठा आहे. हे धरण शंभर टक्के भरण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठे पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. मांजरा धरणाच्या तूलनेत निम्न तेरणा धरण मात्र पुर्ण क्षमतेने भरत आले आहे. या धरणात आजघडीला ९६.९३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

यंदाचा पावसाळा लातूर जिल्ह्यासाठी तसा चांगला ठरला. खरिपाच्या पिकांसाठी मात्र अडचणीचाही ठरला. सततच्या पावसाने जिल्ह्यातील धरणं, नदी, नाले, ओढे, बराजेस, विहिरींना पाणी आले. मांजरा नदीवरील लासरा, बोरगाव अंजनपूर, टाकळगाव देवळा, वांजरखेडा, वांगदरी, कारसा पोहरेगाव, नागझरी, साई, खुलगापूर, शिवणी, बिंदगीहाळ, डोंंगरगाव, धनेगाव, होसूर व भूसणी बराज(तावरजा नदी) या बराजमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. मांजरा नदीवरील १५ बराजची शृंखला जलमय झाली आहे. यंदाच्या जुन, जुलैमध्ये ब-यापैकी पाऊस पडला. ऑगस्टच्या प्रारंभीही पावसाची हजेरी होती. संततधार व अतिवृष्टी झाली तशी पावसाने दीर्घ विश्रांतीही घेतली. सप्टेंबर महिना सुरु झाला तो पावसानेच. या महिन्यात दररोज पाऊस पडत आहे. कमी-अधिक प्रमाणात पावसाची दररोज हजेरी आहे.

लातूर जिल्ह्यात पाऊस ब-यापैकी असला तरी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात होईल, असा पाऊस पडलेला नाही. त्यामुळेच पावसाळयाचे तीन महिने संपले तरी या धरणात केवळ ४८.१७ टक्के पाणीसाठा आहे. हे धरण पुर्णत: भरण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची आवश्यकता आहे. मांजरा धरणाची पूर्ण संचय पातळी ६४२.३७ मीटर आहे. एकुंण पाणीसाठा २२४.०९३ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या धरणात ६३९.७४ मीटर पाणीपातळी आहे. एकुण पाणीसाठा १३२.३६६ दशलक्षघनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्कवारी ४८.१७ एवढी आहे. निम्न धरणाची पूर्ण संचय पातळी ६०४.४० मीटर आहे. एकुण पाणीसाठा १२१.१८८ दशलक्षघनमीटर आहे. सध्या या धरणात ६०४.३० मीटर पाणीपातळी आहे. एकुण पाणीसाठा ११८.३८९ दशलक्षघनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्कवारी ९६.९३ एवढी आहे. या दोन्ही धरणात ६४.७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

चार मध्यम प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरले
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील व्हटी, उदगीर तालुक्यातील देवर्जन, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ व याच तालुक्यातील घरणी हे चार मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात ७२.२२ टक्के, रेणापूर तालुक्यातील रेणापुर मध्यम प्रकल्पात ९८.१२ टक्के, उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पात ८१.२३ टक्के तर निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ८३.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांत एकुण ९०.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांत ८७.९० टक्के तर जिल्ह्यातील एकुण १४२ प्रकल्पांत ७९.६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या