26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याकडून २६५५.६१ चा अंतिम ऊस दर जाहीर

मांजरा साखर कारखान्याकडून २६५५.६१ चा अंतिम ऊस दर जाहीर

एकमत ऑनलाईन

विलासनगर : प्रतिनिधी
विद्यमान गळीत हंगामातील गळीत ऊसाचा एफ. आर. पी. नुसार होणारा तिसरा हप्ता रुपये २५५.६१( प्रती मे. टन) प्रमाणे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे संचालक आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी जाहीर केला आहे. यानुसार विद्यमान वर्षातील एफआरपीनुसार अंतिम दर एकूण २६५५.६१ एवढा निश्चित झाला आहे.
\
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने स्थापनेपासून ते आजपर्यंतचे सर्व गळीत हंगाम यशस्वी केले आहेत. विद्यमान गळीत हंगाम हा आजपर्यंतच्या सर्व हंगामा पेक्षा वेगळा ठरला. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्याने साखर कारखानदारी समोर मोठा प्रश्न ऊस गाळपाचा निर्माण झाला होता. अशा प्रतिकुल परस्थितीत मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी वेळोवेळी दैनंदिन गाळपाचा आढावा घेवून अधिका-यांना सुचना देवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊस गाळप करुनच कारखाना गळीत हंगामाची सांगता केली.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने एफआरपी नुसार होणारी पहिली उचल रक्कम प्रति. में. टन २२०० रुपये व दुसरा हप्ता २०० रुपये व आता तीसरा हप्ता २५५.६१ रुपये, असे एकूण २६५५.६१ रुपये एवढा अंतिम दर देण्यात आला आहे. यानुसार विद्यमान गळीत हंगामात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडून २२८ कोटी ३७ लाख एवढी रक्कम शेतकरी सभासदांना अदा करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या