23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरमांजरा-तेरणा संगम परिसरात होतोय पुरस्थितीचा अभ्यास

मांजरा-तेरणा संगम परिसरात होतोय पुरस्थितीचा अभ्यास

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदी संगम परिसरात पुराचे पाणी वाढल्यानंतर शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडीबाबत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) चे पथक गुरुवार दि. २ जून रोजी लातूरमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी नदीकाठच्या गावांची पाहणी करण्यास सुरवातही केली आहे.

मांजरा व तेरणा नदीच्या संगमाजवळ पुराचे पाणी वाढल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांनी तगरखेडा येथे जावून पुरस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन मांजरा व तेरणा नदीच्या संगम परिसरात बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडी करण्याबाबत चर्चाही केली. जयंत पाटील यांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

त्यानुसार गुरुवारी सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च सेंटर (सीडब्ल्यूपीआरएस) च्या पथकाने लातूरमध्ये येऊन संबंधित गावांची पाहणी केली. पुराचे पाणी वाढल्यानंतर या भागातील तगरखेडा गावापर्यंत, साडेतीन किलो मीटर लांबीमध्ये नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे अनेक शेतक-यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे नुकसान लवकरच टाळता येणार आहे. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या