लातूर : लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदी संगम परिसरात पुराचे पाणी वाढल्यानंतर शेतक-यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडीबाबत पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार सेंट्रल वॉटर ऍण्ड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) चे पथक गुरुवारी (नि. २) लातूरमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी नदीकाठच्या गावांची पाहणी करण्यास सुरूवातही केली आहे.
मांजरा व तेरणा नदीच्या संगमाजवळ पुराचे पाणी वाढल्याने पालकमंत्री अमित देशमुख यांनी तगरखेडा येथे जावून पुरस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन मांजरा व तेरणा नदीच्या संगम परिसरात बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडी करण्याबाबत चर्चाही केली. जयंत पाटील यांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद दिला.