18 C
Latur
Friday, December 4, 2020
Home लातूर मराठा तरुणांनो खचू नका, आत्महत्या करु नका

मराठा तरुणांनो खचू नका, आत्महत्या करु नका

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : मराठा समाज हा लढवय्या समाज असून तो रडणारा नाही तर तो लढणारा आहे. आपली लढाई आजून संपली नाही आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल न उचलता मराठा समाजातील युवकांनी नाऊमेद होऊ, नये असे प्रतिपादन मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले. अहमदपूर येथील विश्रामगृहात मराठा आरक्षण स्थगिती उठवण्यासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विचारपीठावर आमदार बाबासाहेब पाटील, माजी सभापती दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, मराठा सेवा संघाचे, अशोक चापटे, बाळासाहेब औताडे, कुणाल मराठे, प्रभू भालेकर, संदिप फाजगे,सागर जाधव ऋषीकेश चिपाटे, अमर लोखंडे,अक्षय शिंदे,बबन हांडे,डी.के.जाधव यांची उपस्थिती होती.

अ‍ॅड. विनोद पाटील म्हणाले की, सुप्रीम कोर्टाची स्थगिती ही कायम नसून ती तात्पुरती आहे. येत्या काही दिवसांतच स्थगिती उठेल त्यावेळी फेटा बांधायला अहमदपुरात येईन, मराठा समाजातील युवक इच्छा असूनही शिक्षण घेऊ शकत नाहीत. पात्रता असूनही त्याला नोकरी मिळत नाही अन्य राज्यांमध्ये १४ वर्षांपासून आरक्षणाला स्थगिती नाही. मराठा आरक्षण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करायचे असेल तर सुप्रीम कोर्टाला स्थगिती कशी देता येईल. ज्या वेळी अधिक लोकांचा संबंध येतो त्यावेळी घटनेचा संबंध येतो त्याच वेळी पाच न्यायमूर्तींना न्याय देण्याचा अधिकार येतो असे असताना कधी स्वप्नातही वाटले नाही की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळेल दुर्देवाने काही गोष्टींमुळे ती तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. ती लवकरच उठणार आहे, असेही विनोद पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, मराठा समाज सत्तेत असताना मराठा समाजातील राज्यकर्त्यांनी अगोदर इतरांना देण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचल्यावर इतरांच्या भल्यासाठी जगण्याची उमेद आपल्याला मिळते परंतु आज मराठा समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. मुलांना शिक्षण घेऊन नोकरी मिळत नाही. ज्यावेळी समाजाची आर्थिक परिस्थिती कमकुवत होते. त्यावेळी समाज स्वत:च्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरतो. मराठा समाजातील मूठभर लोकांकडे जरी श्रीमंती असली तरी याचा अर्थ असा होत नाही की सर्व समाज श्रीमंत आहे. शेतीचे विभाजन झाल्याने शेतक-यांची मुले ही विवंचनेत आहेत. त्यांना आरक्षणाची गरज आहे, असेही आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.

यावेळी दिलीपराव देशमुख म्हणाले की, आरक्षणाबाबत निघालेले ५८ मोर्चे जगाला आदर्श असावेत असे होते. छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराजांनी अन्य समाजाला न्याय दिला आहे. त्या त्या समाजातील नेत्यांनी शासन दरबारी शिकस्त लावून आरक्षण मिळवून घेतले पण मराठा समाजाच्या नेत्यांनी पन्नास वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले पण ते आरक्षण देऊशकले नाहीत.मराठा समाजात भरकटला आहे. युवक दिशाहीन झाला आह.े शेतात पिकत नाही पिकली तर विकत नाही त्यापेक्षा मजूर बरा आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील तुम्ही आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी दिलीपराव देशमुख यांनी केली. यावेळी गोविंद शेळके यांनीही मराठा युवकांना मार्गदर्शन केले.

प्रस्ताविक प्रा.दत्ता गलाले यांनी केले. सूत्रसंचालन पुरुषोत्तम माने यांनी तर आभार प्रा गोंिवद घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकेश पाटील, सुधीर गोरटे, प्रशांत भोसले,अक्षय देशमुख, ज्ञानोबा भोसले, प्रा मारोती बुद्रुक पाटील, आकाश पाटील, नितीन पाटील, शिवराज चोथवे, आनंद जाधव, सिद्धार्थ दापके, दत्ताभाऊ कदम, रामभाऊ सूर्यवंशी आदींनी प्रयत्न केले.

अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहतेय

ताज्या बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

आणखीन बातम्या

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

शेतक-यांसाठी काँग्रेसचा एल्गार

लातूर : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कृषी कायद्याविरोधात देशभरातील शेतक-यांमध्ये तीव्र संताप असून या कायद्याविरोधात शेतकरी एकवटला आहे. हे जाचक कायदे रद्द करावेत या...

लातूर जिल्ह्यात ५० नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५० नव्या रुग्णांची भर पडली आहे़ बुधवार दि़ २ डिसेंबर रोजी...

‘जाकीर’संस्थेच्या मदतीमुळे वाचले मनोरुग्णाचे प्राण

निलंगा (लक्ष्मण पाटील ) : तालुक्यातील औराद शहाजानी येथील औराद-बिदर रस्त्यावर रस्त्याच्या कडेला गेल्या तीन दिवसांपासून आशा थंडीच्या दिवसात अगदी बेवारसासारखे पडलेल्या एका मनोरुग्णाला...

लातूर जिल्ह्यातील १३९५८ पदवीधरांची मतदानाकडे पाठ

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार...

पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव

लातूर : लातूर कपडा बँकेच्या वतीने सामाजिक उपक्रमाचा एक धागा बनण्यासाठी लातूरचे सुपूत्र पद्मभूषण सन्मानीत डॉ. अशोक कुकडे यांनी दि,. २ डिसेंबर रोजी लातूर...

लातूर-गुलबर्गा रेल्वे औसा येथूनच धावणार

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा रेल्वेप्रश्नी एकीकडे आमदार अभिमन्यू पवार आक्रमक झाले असताना त्यांना साथ देण्यासाठी सर्व औसेकरही आक्रमक झाले आहेत. सर्व पक्षीय नेते,...

कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्या, सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन...

जन्म होता घरात कन्येचा लेकीची ओवाळूया आरती…

लातूर : लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व सौ. सोनम श्रीकांत यांना ३० नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल ३० मोठी झाडे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...