22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरमराठवाडा मुक्ती, विद्यापीठ वर्धापनदिन साजरा

मराठवाडा मुक्ती, विद्यापीठ वर्धापनदिन साजरा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात ७४ वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन व २८ वा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त स्वातंत्र्य सैनीक व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच त्यांचा मानसन्मानही करण्यात आला.

साकोळ प्रशालेत माजी सैनिकांचा सत्कार
शिरुर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील जिल्हा परिषद प्रशालेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग व नाटिकांमध्ये सहभागी व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने समृद्धी भिका या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला होता. तसेच भारतीय सैन्य दलात मोलाची कामगिरी बजावलेले माजी सैनिक ताज खान यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक श्रीमंत मेढे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संगमेश्वर होनमाळे, सरपंच कमलाकर मादळे, माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला, सोसायटीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र साकोळे,भालचंद्र आवाळे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्यांदाच चार गावात शासकीय ध्वजारोहण
उदगीर : मुक्ती संग्रामच्या लढयातील उदगीर तालुक्यातील तोंडचिर येथे नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांच्या हस्ते, कौळखेड येथे तलाठी किशोर पाटील यांच्या हस्ते, रामतांडा येथे नायब तहसीलदार धुमाळ, हत्तीबेट येथे नायब तहसीलदार प्रकाशराव कुटाळे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती यांच्या उपस्थितीत तर हत्तीबेट येथे नायब तहसीलदार प्रकाश कुटूळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवकासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदगीर तालुक्यातील चार गावच्या ठिकाणी मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त पहिल्यांदाच शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. सैनिकांची स्वप्नपूर्ती मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाची भूमिका असलेल्या कौल खेड, रामतांडा, हत्तीबेट, तोंडचिरच्या रामघाटात शासकीय ध्वजारोहण व्हावे, अशी मागणी किसान दलातील लढा दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी २२ वर्षापूर्वी केली होती. ती आज पूर्ण झाली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या