28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरनीटमध्ये मारिया शेख प्रथम

नीटमध्ये मारिया शेख प्रथम

एकमत ऑनलाईन

लातूर : राजर्षी शाहू महाविद्यालयाची शेख मारिया अरहम शेख फरदौस फातिमा ५९७ गुण मिळवून महाविद्यालयातून अनुसूचित जमाती संवर्गातून प्रथम आलेली आहे व तिचा ऑल इंडिया रँक ८१ असून रँकनुसार एम्स महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चित होऊ शकतो. महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना ६५० पेक्षा अधिक, ९५ विद्यार्थ्यांना ६०० पेक्षा अधिक व तसेच ५५० पेक्षा अधिक गुण असणारे २२७ विद्यार्थी, ५०० पेक्षा अधिक गुण मिळवणारे ४०२ विद्यार्थी असल्याचे सिद्ध झाले आहे. हा निकाल एकूण १६८५ विद्यार्थ्यांचा आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव गोपाळ शिंदे, सहसचिव सुनिल सोनवणे व इतर सर्व संचालक, सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. सुहास गोरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, पर्यवेक्षक प्रा. जयराज गंगणे, प्रा.विनोद झरीटाकळीकर व इतर सर्व समन्वयक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या