22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeलातूररमजान ईदच्या खरेदीसाठी आज व उद्या बाजारपेठ उघडी

रमजान ईदच्या खरेदीसाठी आज व उद्या बाजारपेठ उघडी

एकमत ऑनलाईन

लातूर : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन संदर्भ क्रमांक ७ अन्वये लातूर जिल्ह्यात लावण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन निर्बंध कालावधीत रमजान (ईद-उल फित्र) असल्यामुळे दि. ११ व १२ मे रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत किराना दुकाो, ड्रायफ्रु ट्स, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, अंडी, मासे, बेकरी, दुध विक्री दुकाने सुरु राहातील, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दि. १० मे रोजी फेसबुकवरुन लाईव्ह संवाद साधताना नमुद केले आहे.

२९ एप्रिल २०२१ च्या आदेशन्वये कोविड-१९ विषाणुचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात दि. १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच आठवड्यातील शनिवार व रविवार या वीकेंड लॉकउाऊन प्रमाणे दि. ८ ते १३ मे या कालावधीत वीकेंड लॉकडाऊन प्रमाणे निर्बंध लागु करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि या निर्बंधात रमजान ईदनिमित्त सुट देण्याची बाब जिल्हा प्राधिकरणाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले. या लाईव्ह संवादात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी रमजान ईद निमित्त लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात दिलेली सुट अशी असेल, या अनुषंगाने सविस्तर विवेचन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिवन गोयल यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थिती, केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी यांनी लातूर शहरातील कोरोना स्थितीची माहिती दिली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कोरोना आणि रमजान ईद निमित्त जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजना संदर्भात माहिती दिली.

अशी राहील सूट.
↪ रमजान ईद निमित्त आज व उद्या सकाळी ७ ते दुपारी १२ यावेळेत फ क्त रमजान ईद निमित्त खरेदीसाठी किराणा दुकाने, ड्रायफ्रु टस्, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, अंडी मासे, बेकरी, दुध विक्री सुरु राहील.
↪ दि. १२ मे रोजी केवळ हातगाड्यावर फि रुन फ ळांची विक्री, दुध विक्री, चिकन, मटन सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत करता येईल.
↪ चंद्रदर्शननंतर रमजान ईद दि. १४ मे रोजी साजरी होणार असल्यास दि. १३ मे रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत ड्रायफ्रु टस्, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन विक्रीची दुकाने, अंडी मासे, बेकरी, दुध विक्री सुरु राहील.

घ्यावयाची काळजी
↪ रमजान ईदनिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून आपल्या घराच्या नजीकच्या दुकानातूनच खरेदी करावे, होम डिलिव्हरीला प्राधान्य द्यावे. नागरिकांनी खरेदीसाठी वाहनांचा वापर शक्यतो टाळावा.
↪ रमजान ईदनिमित्त किराणा, भाजीपाला आदी साहित्य खरेदी करण्यासाठी गंजगोलाई, मस्जिद रोड, भुसार लाईन, सुभाष चौक, आंबा हनुमान, खोरीगल्ली, मित्रनगर, दयानंद गेट, राजीव गांधी चौक आदी मुख्य बाजारपेठेत गर्दी करु नये, आपल्या कॉलनीच्या जवळच्या दुकानातूनच सामान खरेदी करावे.
↪ नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी विक्री करणारे दुकान दार यांनी त्यांच्या दुकानासमोर ठरावी शारिरीक अंतर ठेवण्यासाठी वर्तुळ आकाराचे चिन्ह करावे. जीवनावश्यक वस्तू व्यक्तीरिक्त इतर वस्तुंची विक्री करु नये.
↪ देण्यात आलेल्या सुटमध्ये दुूकानदार व नागरिकांनी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास नियमानूसार कारवाई करण्यात येईल.

आम्ही ‘सामना’ वाचत नाही; नाना पटोले यांचा संजय राऊतांना टोला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या