24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरशहीद जवान सुर्यकांत तेलंगे यांचे पार्थिव आज पुण्याला पोहचणार

शहीद जवान सुर्यकांत तेलंगे यांचे पार्थिव आज पुण्याला पोहचणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय सैन्यातील ब्रिगेड ऑफ दि गार्डस रेजिमेंटमधील १५ गार्डस बटालियनचे सेवारत सैनिक नंबर १५६२११६७-हवालदार तेलंगे सुर्यकांत शेषेराव गाव थेरगाव ता. शिरुर अनंतपाळ जि. लातूर हे कर्तव्य बजावताना दि. २७ जून रोजी दुर्देवी घटनेमध्ये जखमी होऊन १६७ मिल्ट्री हॉस्पीटल पठाणकोट येथे दि. २७ जून रोजी दुपारी ३.५५ वाजता मृत घोषित केले आहे. त्यांचे पार्थिक अमृसर येथून दि. २८ जून रोजी (२३.५५ वाजता) हवाई विमानाने निघून पुणे येथे दि. २९ जून रोजी पहाटे २.३० वाजता पोहचणार असून तिथून रस्ता मार्गे थेरगाव ता. शिरूर अनंतपाळकडे येणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या