36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeलातूरमारूती महाराज कारखाना पूर्णत्वाकडे

मारूती महाराज कारखाना पूर्णत्वाकडे

एकमत ऑनलाईन

औसा (संजय सगरे ) : तालुक्यातील बेलकुंड येथील मारुती महाराज सहकारी साखर कारखान्यातील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून हा कारखाना लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी हा सहकारी साखर कारखाना सुरु करण्याचा शब्द दिला होता.

राज्यात नव्हे देशात साखर कारखानदारीत मध्ये लातूरचा मांजरा साखर परिवाराचा नावलौकिक असून त्या परिवारातील मार्गदर्शक तथा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख,राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री पालकमंत्री अमित विलासराव देशमुख हे जेव्हा एखादा शब्द देतात तेव्हा ते करुन दाखवतात याचे उदाहरण म्हणजे औसा तालुक्यातील बेलकुंड येथील मारूती महाराज सहकारी साखर कारखाना.

गेली अनेक वर्षांपासून बंद असलेले हे शेतक-यांचे मंदिर अखेर गतवर्षी झालेल्या निवडणुकीत मोठ्या विश्वासाने सभासदांनी जनमताचा कारखाना मांजरा परिवाराच्या ताब्यात दिला. निवडणुकीच्या फडात पालकमंत्री अमित देशमुख यांनी लोकांना शब्द दिला होता तुम्ही निवडून द्या आम्ही साखर कारखाना सुरू करून पुन्हा शेतक-याचा मालकीचा करू असे ठोस आश्वासन दिले होत.

सध्या साखर कारखाना सुरु होण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. आज तब्बल कारखानास्थळी १३५ कामगार काम करीत असून लवकरच हा साखर कारखान्यातून धूर निघेल अशी पावले पुढे पडत आहेत. राज्यातील अनेक साखर कारखाने शेवटची घटका , बंद अवस्थेत बँकेच्या ताब्यात तर अनेक कारखाने मोडकळीस येऊन मशिनरी धूळखात पडून राहिली आहे निवडणुका तोंडावर आल्यानंतर पुढारी आश्वासन देतात पुढें काहीच होत नाही असे मराठवाड्यात जवळपास १० ते १२ सहकारी साखर कारखाने बंद आवस्थेत आहेत कोणी पुढाकार घ्यावा असाही प्रश्न असतो स्थानिक पातळीवर अनेक विषय असतात कोणी राजकारण करीत असतात कुणाला बँकेची आर्थिक मदत नसते अनेक अडचणी येतात त्यामुळे अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत

साखर कारखाना स्थळी कामगार अधिकारी कर्मचा-यांची लगभग
सुरू आहे. मशिनरी, इलेक्ट्रीकल, ऑईंिलंग, नट बोल्ट, फिटीगची सर्व कामे जलदगतीने अंतिम टप्प्यात सुरू आहेत लवकरच हा साखर कारखाना सुरूहोणार आहे.

मराठी सारस्वतांच्या मांदियाळीत विज्ञान साहित्याचा महासन्मान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या