28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरमारुती महाराज कारखान्यात डिस्टलरी प्रकल्प उभारणार

मारुती महाराज कारखान्यात डिस्टलरी प्रकल्प उभारणार

एकमत ऑनलाईन

औसा : मांजरा साखर हा मोठा परिवार असून शेतकरी हा केंद्रंिबंदू समोर ठेवून पारदर्शकता आणत परिवाराने जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने काम करीत असून शेतक-यांना जितकी मदत करता येईल ते करण्याचें काम परिवाराने केले आहे. सात वर्षांपासून बंद असलेल्या मारूती महाराज साखर कारखान्याने गतवर्षी चांगले गाळप केले. भविष्यात या कारखान्यात डिस्टलरी, को जनरेशन प्रकल्प उभा करणार असल्याचे मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले.\

शनिवार दि २० ऑगस्ट रोजी औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत श्री शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामाच्या २०२२- २३ च्या मील रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होतेप्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड श्रीपतराव काकडे, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, संत मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपती बाजुळगे, उपाध्यक्ष श्याम भोसले, रेणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, रेणा सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष अंनत देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, अनुप शेळके, जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, उदयंिसंह देशमुख हे उपस्थित होते. यावेळी मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड श्रीपतराव काकडे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुलगे, शेतकरी संघटनेचे राजेन्द्र मोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, माजी संचालक संभाजी सुळ, सचिन दाताळ, हरिराम कुलकर्णी, अ‍ॅड.बाबासाहेब गायकवाड, चांदपाशा इनामदार, सतिष पाटील, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे, बेलकुंडचे सरपंच विष्णू कोळी, मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर, प्रवीण पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक विलास शिंंदे अनिल झिरमिरे, हरीचंद्र यादव, शामराव पाटील, सचिन पाटील, सुरेश पवार हणमंत माळी गितेश शिंंदे, प्रदीप चव्हाण, प्रवीण कोपरकर, प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे हे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे यांनी केले सूत्र संचालन सचिन पाटील यांनी तर आभारप्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले यांनी मांडले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या