22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूर१ मे रोजी मातंग समाज वधू-वर परिचय मेळावा

१ मे रोजी मातंग समाज वधू-वर परिचय मेळावा

एकमत ऑनलाईन

लातूर : येथे अण्णाभाऊ साठे सामाजिक विकास संस्थेच्या वतीने रविवार दिनांक १ मे रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी मातंग समाज राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक आनंदराव कसबे हे असणार आहेत.

तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार सुधाकरराव श्रुंगारे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक शिवाजी नगर लातूर दिलीपराव डोलारे, महानंद डेअरी लातूरचे व्यवस्थापक केशव शहापूरकर, उद्योजक कालिदास लांडगे, राजकुमार जोंधळे, पंडितराव हनुमंते हे उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील गरजू वंत वधू-वर पालक यांना अभिप्रेत असलेले स्थळ मिळावेत म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे तरी समाज बांधवांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक बालाजी सोनकांबळे संयोजन समिती पी. के. शिंदे, गोपाळराव सूर्यवंशी, माणिकराव वाघमारे, नागनाथराव लोंढे, शिवाजी मस्के, भानुदास कुडके, हुसेन कदम, गजेंद्र अवघडे आदींनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या