19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरगणित हे जीवन, निसर्ग व विश्वाला एका सूत्रात बांधते

गणित हे जीवन, निसर्ग व विश्वाला एका सूत्रात बांधते

एकमत ऑनलाईन

लातूर : गणित या विषयाचे मानवी जीवनात व व्यावहारिक जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. म्हणूनच गणित हे नेहमी जीवन, निसर्ग आणि विश्वाला एका सूत्रात बांधत असते. जीवनातील प्रत्येक घटक, वस्तू आणि प्रत्येक क्षेत्रांमध्ये गणिताचा वापर केला जातो. ज्या व्यक्तीला गणित हा विषय जमतो, त्या व्यक्तिच्या आयुष्याच्या जगण्याचे गणित कधीच चुकत नाही. गणित हीच भावी जीवनाच्या, उज्ज्वल आयुष्याची खरी गुरूकिल्ली असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले.

दयानंद विज्ञान महाविद्यालयामध्ये युजीसी-सीपीई अंतर्गत गणित विभागाच्या वतीने आयोजित ‘नॉन लिनियर अँनालिसिस अँन्ड इटस अँप्लिकेशन्स’ या विषयावरील तीन दिवसीय ई-आंतरराष्ट्रीय गणित परिषदेचा समारोप प्रसंगी रमेश बियाणी बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, दक्षिण कोरीयातील प्रो. जे. के. किम, तुर्की येथील कुक्कअस्सलाम, इराण येथील प्रो. रजानी, गणित परिषद समन्वयक व विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉ. एस.एस. बेल्लाळे, प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य डॉ. दरगड म्हणाले की, आज कोरोनाच्या काळात आँफलाईन शिक्षण घेणे कठीण झालेले आहे. अशा या कठीण परिस्थितीत आपणास शिक्षण व ज्ञान घेणे थांबवता येत नाही. म्हणूनच याचा भाग म्हणून महाविद्यालयाच्या वतीने कोरोना काळातही विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी ही आँनलाईन परिषद घेण्यात आली. बदलत्या काळानुसार प्रत्येकांनी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानातील ज्ञान आणि इतर विषयांप्रमाणे गणित विषयातील अद्ययावत ज्ञानाचा अभ्यास करावा, असे ते म्हणाले.

प्रो. रजानी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड १९ मध्ये गणित विषयातील सर्व विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी दयानंद विज्ञान महाविद्यालयाने पुढाकार घेऊन ही परिषद अत्यंत उत्तम पद्धतीने आयोजित केली. त्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. या गणित षरिषदेमध्ये जवळपास तीनशे पाच गणित अभ्यासकांनी सहभाग घेतला. त्यापैकी १९२ जणांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. यामध्ये तीन दिवसामध्ये एकूण १८ सत्र घेण्यात आले. त्यात तीन बीजभाषन, बारा प्लेनरी स्पीकर आणि १६ आमंत्रित स्पीकर यांनी शोधंिनबधाचे वाचन केले.

या समारोप प्रसंगी कॅनडा, रशिया दक्षिण आफ्रिका,दक्षिण कोरीया, तुर्की, रोमानिया, भारत, इराण आदी देशातील विविध सहभागी व्यक्तींनी फीडबॅक दिला. या तीन दिवसीय गणित परिषदेच्या अहवालाचे वाचन सहसमन्वयक डॉ. जावेद अली यांनी केले. प्रा. मेघा पंडित यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. ललित ठाकरे, डॉ. चंद्रशेखर स्वामी, डॉ. रोहिणी शिंदे, डॉ. महादेव पंडगे, देश, विदेशातील गणित अभ्यासक आदि प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Read More  वृक्षांना राखी बांधून जिल्हाधिकारी यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा सल्ला

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या