25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeलातूरवैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून बीड जिल्हयातील खांडवी येथे...

वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडून बीड जिल्हयातील खांडवी येथे अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवार दि.२० आँक्टोबर रोजी बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील खांडवी गावच्या शिवरात भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून धिर दिला. या नुकसानीचे तातडीने पंचानामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिककार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी मंगळवारी बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यात खांडवी येथे जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खांडवी शिवारातील शेतकऱ्यांशी संवाद सांधला अतिवृष्टी तसेच संतधार पावसामुळे सोयाबीनचे पिक शेतातच सडून गेले आहे हे शेतकऱ्यांनी यावेळी निर्दशनास आणून दिले आहे. सोयाबीन प्रमाणेच इतर खरीप पिकाचेही मोठया प्रमाणत नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत वीमा कंपनीशी संपर्क साधून त्यांना या नुकसानीचे गाभीर्य लक्षात आणून दयावे.

सदरील अहवाल शासनाकडे तातडीने पाठवावेत जेणे करून आपादग्रस्थ शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करणे शक्य होईल असे ना. देशमुख यांनी म्हटले आहे. ना. देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धिर दिला काळजी करून नये महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी आहे असे सांगितले आहे. या भेटीच्या वेळी आमदार अमरसिंह पंडीत, बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकीशोर मोदी, महादेव धांडे, भाऊसाहेब नाटकर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार व इतर अधिकारी उपस्थित होते.

कर्ज काढून शेतक-यांना मदत करण्याचा सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या