27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeलातूर२८ जुलैला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सभा

२८ जुलैला जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची सभा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे दि. २२ जुलै आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-२०२२ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांच्या आरक्षणासह) राखुन ठेवावयाच्­या जागा आणि उर्वरीत स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे. दि. २८ जुलै रोजी जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समित्याची सभा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्­हा परिषदेचे नांव, पंचायत समितीचे नांव, सभेची वेळ व तारीख, सभेचे ठिकाण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्­द करण्याच्या दिनांक व आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी पूढीलप्रमाणे आहे. दि. २८ जुलै, रोजी लातूर जिल्हा परिषद सभेची वेळ दुपारी १२ वाजता सभेचे ठिकाण डी. पी. डी. सी. हॉल, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे. अहमदपूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी १२ वाजता सभेचे ठिकाण तहसील कार्यालय अहमदपूर येथे. जळकोट पंचायत समिती सभेची वेळ दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, जळकोट येथे.

उदगीर पंचायत समिती दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, उदगीर येथे. देवणी पंचायत समिती सभेची वेळ सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, देवणी येथे. शिरुर अनंतपाळ पंचायत समिती सभेची वेळ दुपारी १२ वाजता सभेचे ठिकाण तहसील कार्यालय शिरुर अनंतपाळ येथे. चाकूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी १२ वाजता पंचायत समिती सभागृह, चाकूर येथे. रेणापूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय, रेणापूर येथे. लातूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी १२ वाजता जुन्या डी. पी. डी. सी. सभागृह, प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी चौकाजवळ लातूर येथे. औसा पंचायत समिती सभेची वेळ सकाळी ११ मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील, मिटींग हॉल, औसा येथे. निलंगा पंचायत समिती सभेची वेळ दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय येथे सभेचे ठिकाण असणार आहे.

आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याच्या दि. २९जुलै आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी दि. २९ जुल ते २ ऑगस्ट कालावधी असणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे. त्यांनी वरील ठिकाणी व वेळेत हजर रहावे. त्याचप्रमाणे मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दि. २२ जुलै अन्वये लातूर जिल्ह्यातील ३५२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे. आरक्षणाची सोडत काढणे ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दि. २९ जुलै रोजी.

सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दि. १ ऑगस्ट रोजी. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी दि. १ ऑगस्ट ते ३ ऑगस्ट रोजी, उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दि. १० ऑगस्ट रोजी. उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसुचनेस ( नमुना -अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे दि. १२ ऑगस्ट रोजी. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला ( नमुना -अ) व्यापक प्रसिध्दी देण्याचा दि. १७ ऑगस्ट रोजी. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीच्या ग्रामसभेच्या कार्यक्रमावेळेस संबंधित ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
फोटो: १

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या