23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरआगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठक

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी बैठक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याच्या संदर्भाने लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पदाधिका-यांची महत्वपूर्ण तातडीची बैठक काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या बैठकीस वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले आहे.

काही महिन्यापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेस पक्षाने लातूर जिल्ह्यात घवघवीत यश मिळवीले आहे. त्याच धर्तीवर जिल्हा परीषद आणि पंचायत समिती निवडणूकीतही यश मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्वतयारी सुरु केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आणि तातडीची बैठक आज सकाळी ९ वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष, सर्व माजी जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, सदरील निवडणूक लडवण्यास इच्छूक असलेले कार्यकर्ते या सर्वांनी वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या