26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरंपालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतल्या विविध संघटना पदाधिका-यांच्या भेटी

ंपालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतल्या विविध संघटना पदाधिका-यांच्या भेटी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि. २५ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील राजीव गांधी चौक येथील शासकीय विश्रामगृह येथे विविध संस्था, संघटना पदाधिका-यांसह नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. निवेदनाचा स्वीकार केला. या सर्व मागण्या संदर्भात संबंधितांना कार्यवाहीसाठी आवश्यक सूचना केल्या.

यावेळी लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, मनपा विरोधी पक्षनेते अ‍ॅड. दीपक सूळ, मनपा आयुक्त अमन मित्तल, मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजूळगे, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. समद पटेल, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, निलंगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.
a
पालकमंत्री देशमुख यांना यावेळी पानगाव चैत्य स्मारक ट्रस्ट शिष्टमंडळ, पेठ विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध निवडून आल्या बद्दल पेठ येथील शिष्टमंडळ, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन शिष्टमंडळ, ट्रेथलोन असोसिएशन लातूर शिष्टमंडळ आदी शिष्टमंडळाने पालकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या आहेत. माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, लातूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सूर्यशीलाताई मोरे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, नगरसेवक पप्पू देशमुख लातूर काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, संजय निलेगांवकर, नरेंद्र अग्रवाल, व्यंकटेश पुरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक एन. आर. पाटील, प्रा. राजकुमार जाधव, भगवान माकणे, लालासाहेब देशमुख, रमेश माळी, किरण अंधारे, प्राचार्य अजय पाटील, प्रा. अनिरुद्ध बिराजदार, डॉ. राजेश कारस्कर, अविनाश आळंदकर, संपत साळुंके, नारायण झिपरे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, काँग्रेसचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या