लातूर : प्रतिनिधी
देशात आणि राज्यात काही समाज घटकांकडून सामाजिक, धार्मिक वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला जात असून अशा विकृत मानसिकतेच्या विरोधात धर्मगुरु, राजकीय नेते आणि पत्रकारांनी एकत्र येऊन देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन लातुरात शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई जिल्हा शाखा लातूरच्या वतीने येथील नाना-नानी पार्कच्या लॉन्सवर घेण्यात आलेल्या ईद मिलन कार्यक्रमात मान्यवरांनी उपरोक्त आवाहन केले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील तर विचारपीठावर धर्मगुरु भन्ते पय्यानंद, भन्ते संघरत्न,भन्ते पयदीप, फादर सुभाष रकटे, मौलाना मुक्ती ओवेस कासमी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, अॅड. व्यंकटराव बेद्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, बसवंतअप्पा उबाळे, प्रसिद्ध व्यापारी अॅड. जहिरोद्दीन सय्यद, असदखान पठाण, एमआयएमचे नेते अफजल कुरेशी, तौफिक असलम खान, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक देडे आदी उपस्थित होते.
देशात धार्मिक ध्रुवीकरण करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संघाने धार्मिक व सामाजिक सलोखा कायम राहावा म्हणून राजकीय व सामाजिक सद्य परिस्थिती अशी खुल्ली चर्चावर सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित तिन्ही धर्मगुरूंनी कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभे राहण्यास मान्यता देत नसून जगात मानवता हाच खरा धर्म आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर कारभारी, शहराध्यक्ष महादेव डोंबे, जिल्हा संघटक सुधाकर फुले, कोषाध्यक्ष अरुण कांबळे, इलेक्ट्रॉनिक प्रमुख हरुण मोमीन, कय्यूम शेख आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जावेद शेख, मैनोदीन सय्यद, एन. ए. इनामदार, सालार शेख, सुशील वाघमारे, हरिश्चंद्र जाधव,बाबुराव शेळके, बाळकृष्ण धायगुडे,सतीश देशमुख, सुनील बसपुरे,उमेश ब्रिजवासी, सी.एन.तोंडचिर कर, युनुस पटेल, डॉ.सितम सोनवणे, नितीन चालक,प्रमोद मोकाशे, संतोष कदम, धनंजय शेळके, अजय कल्याणी, दीपक पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.