लातूर : लातूर एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या कोरोना स्वतंत्र कक्षाचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण रुग्णालय परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केले
यावेळी सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना संजय बनसोडे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांचा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक आ रमेशअप्पा कराड डॉक्टर हनुमंत कराड यांनी शाल पुष्पगुच्छ संत ज्ञानेश्वराची मूर्ती देऊन सत्कार केला.
यावेळी एमआयटीचे सह कार्यकारी संचालक डॉ हनुमंत कराड, वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठता डॉ बी एस नागोबा, महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय संचालक डॉ सरिता मंत्री रुग्णालय अधीक्षक डॉ एच एच जाधव, विभाग प्रमुख डॉ गजानन गोंधळी, डॉ भालेराव, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुरेश कांबळे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य एस एस सर्वानंद, फिजोथेरपीच्या डॉ स्वाती जाधव, कोर कमिटीचे प्रमुख डॉ अरुणकुमार राव, प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, डॉ एस एस पाटील डॉ हबुसिंग जाधव डॉ विद्या कांदे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख डॉक्टर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सुशांत सिंग प्रकरण : केजे ने चौकशीत केला ऐकूण 150 नावांचा खुलासा