24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरआमदार अमित देशमुख यांनी दिल्या नवदाम्पत्यांस शुभेच्छा

आमदार अमित देशमुख यांनी दिल्या नवदाम्पत्यांस शुभेच्छा

एकमत ऑनलाईन

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. ८ जुलै रोजी दुपारी लातूर अर्बन को-ऑपरेटिव बँकेचे चेअरमन प्रदीप राठी यांची नात व राहुल प्रदीप राठी यांची सुकन्या श्रद्धा व अकोला येथील नरेश बियाणी यांचे चिरंजीव कृष्णव यांच्या लातूर नजीकच्या कार्निवल हॉटेल येथील विवाह सोहळ्यास उपस्थित राहून दाम्पत्यास सुखी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर दुपारी लातूर शहरातील बार्शी रोड येथील गिरवलकर मंगल कार्यालयात दीपक हरी कोटलवार यांचा मुलगा चिरंजीव आकाश व गोविंद राजकुंठवार यांची सुकन्या चीसौका अश्विनी यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यास सुखी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच लातूर शहरातील औसा रोड येथील बिडवे लॉन्स येथे वांजरखेडा येथील नामदेव यशवंतराव कदम यांची सुकन्या चि. सौक़ां. डॉ. योगिता व सुरत येथील नवनाथ मिसाळ यांचे चिरंजीव डॉ. आकाश यांच्या शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहून नूतन वधू-वरांना पुढील सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या