22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरआमदार देशमुख यांचा ग्रामस्थ, कार्यकर्त्यांशी संवाद

आमदार देशमुख यांचा ग्रामस्थ, कार्यकर्त्यांशी संवाद

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील बोरगाव (का), करकट्टा, माटेफळ, खुंटेफळ, हिसोरी, खंडाळा या गावांना भेटी देऊन आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी ग्रामस्थ, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी अतिवृष्टी, सततचा पाऊस, पिकांचे नुकसान, पंचनामे, अशा विविध विषयांवर संवाद साधला. दरम्यान, खंडाळा येथे स्थानिक विकासनिधीतून हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले.

यावर्षी काही भागात अतिवृष्टी, संततधार पाऊस तर काही भागात ढगफुटी झाली आहे. तसेच गोगलगायींचा प्रादुर्भावही झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना जिरायतीसाठी प्रती हेक्टर ५० हजार तर बागायतीसाठी १ लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे केली आहे आणि ही मदत मिळवून देण्यासाठी आपला पाठपुरावाही सुरू आहे, असे आमदार धिरज देशमुख यांनी ग्रामस्थांना सांगितले. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या काळात कायम शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेतले. कर्जमाफी केली. महापूर, कोरोना महामारीसारख्या संकटाच्या काळात महाविकास आघाडी सरकार मदतीसाठी धावून आले. सत्ता असो वा नसो लोकांनी सोपवलेली जबाबदारी आणि लोकहिताची कामे पूर्ण करणे हे आमचे कर्तव्य आहे, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

याप्रसंगी शिक्षक आमदार विक्रम काळे, विजय देशमुख, रवींद्र काळे, धनंजय देशमुख, प्रवीण पाटील, सुभाष घोडके, राजेसाहेब सवई, हनुमंत महाराज, दत्त महाराज फुलारी, अमोल महाराज शास्त्री, धनंजय ढोणे, लहू काळे, अंकुश नाडे, सीमा क्षीरसागर, संचालक बडगे, भगवान देशमुख, सतीश काळे, अनिता काळे, भारत आदमाने, अभयंिसंह नाडे, आकाश कणसे, डॉ. दिनेश नवगिरे, श्रीकृष्ण काळे, खंडाळाचे सरपंच दगडुबाई नामदेव गरड, उपसरपंच रेखा हरश्चंिद्र झाडके, शेषेराव झाडके, दत्तात्रय शिंदे, दत्ता पाटील, हिसोरीचे सरपंच व्यंकट ठोंबरे, कमलाकर शिंंदे, जयचंद शिंदे, राम गोरे, करकट्टाचे सरपंच शाम गाडे, सुग्रीव गाडे, शिवाजी इंगळे, विशाल पाटील, पी. के. पाटील, प्रताप खोसे, यशवंत शिंंदे, भैरवनाथ झाडके, दिगंबर इंगळे यांच्यासह काँगेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या