25 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home लातूर आमदार धिरज देशमुख यांनी केली सोयाबीनची पेरणी

आमदार धिरज देशमुख यांनी केली सोयाबीनची पेरणी

एकमत ऑनलाईन

लातूर : पेरणी योग्य पाऊस होत असल्याने खरिपाच्या पेरणीची सर्वत्र लगबग सुरू  आहे. वेळेत पेरणी व्हावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील आहे. अशातच शेतीची जाण व आवड असणारे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या बाभळगाव येथील शेतात ट्रॅक्टरद्वारे पाळी घालून सोयाबीनची पेरणी केली.

आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दि. २४ जून २०२० रोजी बाभळगाव येथील शेतात दीड एकर क्षेत्राला पहिल्यांदा पाळी घातली. त्यानंतर त्या क्षेत्रावर ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राच्या सहायाने सोयाबीनची पेरणी केली. आई श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या समवेत आमदार धिरज देशमुख हे शेतीत नेहमी विविध प्रयोग करीत असतात.

ते कुटुंबाची शेतीशी असलेली नाळ कधीही तुटू नये, यासाठी सदैव प्रयत्नशिल असतात. लोकनेते विलासराव देशमुख यांचे शेतीबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहेच. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यमान वर्षी पाऊस हा समाधानकारक वाटचाल करीत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खुप मोठ्या आशा खरीप हंगामाकडून आहेत. सध्या विविध उद्योग, व्यवसायात अडचणी जाणवत आहेत. अशा परिस्थितीत सगळीकडे शेती कामाला गती आली आहे.

शेती हा आपल्या देशाचा पाया असून शेतीमुळेच आपला देश अन्न-धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे त्यामुळे जमेल त्या पध्दतीने युवकांनी शेतीकडेदेखील लक्ष देऊन घरच्यांना मदत करायला हवी व शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवावा, असा विचार आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सातत्याने व्यक्त केला आहे.

या विचारास स्वत: सोयाबीनची पेरणी करून चालना देण्याचे काम आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे. या वेळी आमदार धिरज देशमुख मातोश्री श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या सोबत शेतीच्या आठवणीत रममाण झाल्याचेही दिसून आले. या वेळी आमदार धिरज देशमुख यांच्या पत्नी सौ. दीपशिखा देशमुख आपल्या मुलांसमवेत उपस्थित होत्या.

Read More  तपासाचा अहवाल : क्रॅशपूर्वी पायलट करीत होते कोरोनाव्हायरसवर चर्चा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या