उदगीर : प्रतिनिधी
लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पीयनशिप २०२३ उदगीरच्या वतीने जिल्हा परिषद मैदान उदगीर येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील क्रीडा प्रेमी, क्रिकेट प्रेमी खेळाडूंना खेळाचे उत्तम व्यासपीठ निर्माण व्हावे, ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमी तरुणांना या व्यासपीठच्या माध्यमातून राज्य स्तरावर तसेच देश पातळीवर खेळण्याची संधी निर्माण व्हावी.या उद्देशाने महाराष्ट्राचे लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये उदगीर तालुक्यातील एकूण ५२ टीम सहभागी झाल्या आहेत. आज हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत या स्पर्धांचा पहिला दिवस पार पडला.
आजची मॅच व्ही.आर.एन ग्रुप टीम उदगीर व लातूर ग्रामीण टीम लातूर यांच्या मध्ये पर पडली. लातूर ग्रामीण टीमचे कॅप्टन आमदार धीरज देशमुख हे होते अतिशय अटी तटीच्या झालेल्या या सामन्यात उदगीर व्ही आर एन टीमने शेवटच्या षटकात सामना ंिजकला. चौकार षटकार मारताना व अलगद एखाद्याची विकेट काढलेले पाहणारे उदगीरकर आज धीरज देशमुख हे मैदानात उतरून चौकार षटकार व विकेट काढतांना पहताना त्यांना प्रतिसाद मिळाला. या वेळी आमदार धीरज देशमुख बोलताना म्हणाले की, या स्पर्धांमधून जे खेळाडू उत्तम निघतील त्यांना क्रिकेटमधील पुढील शिक्षण घेण्यासाठी ते आपल्या ग्रामीण भागातून उत्तम खेळाडू निर्माण व्हावेत ते राज्य स्तरावर उत्तम खेळाडू व्हावेत यासाठी मी स्वत: त्यांच्या पाठीशी राहीन. यावेळी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी व काँग्रेस पक्षाचे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.