24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeलातूरदेवणी गोवंश जतन करण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांचे प्रयत्न

देवणी गोवंश जतन करण्यासाठी आमदार धिरज देशमुख यांचे प्रयत्न

एकमत ऑनलाईन

लातूर : देवणी गोवंशाची संख्या कमी होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी व देवणी गोवंशाचे जतन होण्यासाठी बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रुव्हमेंट ऑफ डेअरी अ‍ॅनिमल्स या संस्थांकडून मदतीचा हात मिळणार आहे. यासाठी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेतला असून संस्थेचे विश्वस्त रणजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रुव्हमेंट ऑफ डेअरी अ‍ॅनिमल्स या बहुपयोगी प्रकल्पाला आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी भेट दिली. शेतक-यांच्या प्रशिक्षणापासून दुधाळ गायी-म्हशीच्या चांगल्या वंशावळीच्या संगोपनापर्यंतची विविध स्तरावरील कामे एकाच छताखाली येथे चालतात. शेतक-यांचे हित केंद्रस्थानी ठेवून आदरणीय शरद पवार साहेब नेहमीच आपल्या दूरदृष्टिकोनातून निरनिराळे प्रयोग राबवत असतात. त्यापैकीच हा एक प्रकल्प आहे.

सध्या देवणी गोवंशाची संख्या कमी होत चालली आहे. या विषयावर आमदार धिरज देशमुख आणि विश्वस्त रणजित पवार यांच्यात चर्चा झाली. देवणी गोवंशाचे जतन करण्याबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, संशोधन, अभ्यास, खाद्य व्यवस्थापन, रोगनिदान अशा विविध स्तरावर सहकार्य केले जाईल, असा शब्द रणजित पवार यांनी यावेळी दिला. दरम्यान, अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक्स इंप्रुव्हमेंट ऑफ डेअरी अ‍ॅनिमल्स यांच्या विविध स्तरावरील सहकार्यामुळे आपल्या भागातील शेतकरी, विद्यार्थी, अभ्यासक यांना फायदा होईल. शिवाय, लातूरची देवणी अशी ओळख राज्यात आणि राज्याबाहेर तयार होण्यास, दूध उत्पादन क्षेत्रात लातूर आणखी पुढे जाण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केला.

जानेवारीपासून युपीआय पेमेंटवर शुल्क आकारणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या