22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeलातूरआमदार निलंगेकरांनी घेतला विभागप्रमुखांकडून आढावा

आमदार निलंगेकरांनी घेतला विभागप्रमुखांकडून आढावा

एकमत ऑनलाईन

निलंगा : माजी कॅबिनेट मंत्री तथ आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी व शिरुर-अनंतपाळ तालुक्यातील विविध विभाग प्रमुखांची येथील पंचायत समिती सभागृहात बैठक घेऊन विकास कामाचा आढावा घेत संबंधित विभाग प्रमुखांना सूचना दिल्या.

आढावा बैठकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विकास कामाच्या आढावा घेऊन अधिका-यांना सूचना दिल्या. यात निधी खर्चामध्ये आरोग्य व शिक्षण विभागाला विशेष प्राधान्य द्यावे. मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शौचालय, कायमस्वरुपीे पाणी पुरवठा व इतर सोयीसुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात यावा.

जिल्हा परिषदांच्या या शाळांमधून दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता शाळेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडावे. अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणासाठी शिबिरे आयोजित करून मुलांमध्ये बाल्यावस्थेतच शिक्षणाविषयी गोडी निर्माण करावी. शेतक-यांचे उत्पन्न वाढीसाठी पारंपारिक शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्यायासाठी कृषितज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक विभागात येणा-या शासनाच्या निधीची सुक्ष््म नियोजन करुन वेळेत खर्च होण्यासाठी लवकरात लवकर आराखडा तयार करण्यात यावा.

केंद्रशासनाच्या वतीने किसान _क्रेडिट_कार्ड या योजनेचा लाभ शेतक-याना मिळवून देण्यासाठी जनजागृती करावी.रोहित्रे (डीपी) वेळेत पुरविण्याचे निर्देश दिले. राज्य शासनाच्या महावितरण विभागाअंतर्गत पुन्हा भारनियमन सुरु करण्यात आले आहे. भारनियमन रात्रीच्या वेळी होणार नाही याची काळजी घेतल्यास विद्यार्थी व सर्वसामान्य नागंिरकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी आदी सूचना आमदार निलंगेकर यांनी अधिका-यांना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी सौ.शोभा जाधव, निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, देवणीचे तहसिलदार सुरेश घोळवे, देवणीचे गटविकास अधिकारी महेश सुळे, शिरुर अनंतपाळचे तहसिलदार अतुल जटाळे, शिरुर-अनंतपाळ गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण आदीसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या