22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeलातूरलातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आमदार पाटील यांचे धरणे

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आमदार पाटील यांचे धरणे

एकमत ऑनलाईन

चाकूर/अहमदपुर : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजविण्याच्या मागणीसाठी शनिवारी नांदेड येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाच्या समोर चाकुर-अहमदपुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

नांदेड-लातूर महामार्गावरून दररोज हजारो वाहनांचे जाणे येणे आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने कांही ठिकाणी बाजूचा रस्ता पट्टा खोदण्यात आला आहे. सध्याच्या वहातूक होणा-या या रस्त्यावर एक ते दिड फुट खोलीचे हजारो खड्डे पडले असून रस्त्याची चाळणी झाली आहे. मागील वर्षभरापासून या रस्त्यावरून गाडी चालवताना वहान चालकांना जीव मुठीत घेऊन वहान चालवावं लागत आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे ओळखणे कठीण झालेले आहे. अपघात होऊन खड्ड्यांनी शेकडो लोकांचा बळी घेतला आहे. या रोडवर अनेक नागरिकांना व्यंगत्व आलेले आहे. अनेकांचे हात पाय मोडताहेत, पाठीच्या कण्याचे, मानेचे आजार वाढत आहेत. लाखो रुपयांची वाहने खराब होत आहेत. यामुळे लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावीत म्हणून या आगोदर आमदार बाबासाहेब पाटील यांनी वेळोवेळी तोंडी सूचना, पत्र व्यवहार करूनही संबंधित आधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने हे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अहमदपूर मतदार संघातील सांगवी ते महाळंग्रा पर्यंतचे खड्डे येत्या दोन दिवसात बुजवून नाही घेतले तर नांदेड येथील प्रकल्प संचालकाच्या कार्यालयासमोर लाक्षणीक उपोषण करण्याचा इशारा दिला असून उपोषणामुळे प्रशासनास कांही अडचणी निर्माण झाल्या तर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असे आमदारांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव जाधव, जळकोट तालुका अध्यक्ष अर्जुन आगलावे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, अजहर बागवान, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, प्रशांत भोसले, शाम देवकते, विठ्ठल चव्हाण, वसंत शेटकार, इलियास सय्यद, सतीश नवटक्के, किरण बारमाळे, संग्राम गायकवाड, तानाजी राजे, व्यंकट वंगे, सचिन जाधव, लिंबाजी गंगापूरे, अनिल बेंबडे, अमित जाधव, धनराज पाटील, गणेश जाधव, बालाजी तिडोळे, सुदर्शन बेंबडे, जाकीर बागवान, ईस्माईल शेख, आयुब शेख, गंगाधर ताडमे, फिरोज शेख, आशिष तोगरे, संदीप शिंदे, बाळासाहेब बेडदे, शेख इझराइल सह आदी उपस्थित होते.

तुमचा हातगुन आन् आमचं नशीब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या