26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरआमदार पवार उपोषणकर्त्या शेतक-याच्या बांधावर

आमदार पवार उपोषणकर्त्या शेतक-याच्या बांधावर

एकमत ऑनलाईन

औसा : नागरसोगा ते वाघोली रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नैसर्गिक नाल्यास जाऊन मिळणारे पाणी अडवून ते रस्त्यावर सोडण्यात आले. यामुळे सर्व पाणी शेतक-याच्या शेतात आल्याने शेतात मोठे नुकसान झाल्याने सदरील रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या शेतक-याला न्याय देण्यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वातंत्र्यदिनी प्रशासनासह थेट उपोषणकर्त्या शेतीच्या बांधांवर जाऊन पाहाणी केली. याप्रकरणी तातडीने कायदेशीर निपटारा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आमदारांच्या या आश्वासनानंतर उपोषणकर्त्या शेतक-यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

नागरसोगा येथील शेतकरी नारायण माळी (वय ८५) हे औसा तहसील कार्यालयासमोर नागरसोगा -वाघोली रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याच्या मागणीवरून उपोषणाला बसले होते. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी आमदार अभिमन्यू पवार हे तहसील कार्यालयात स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी जात असताना सदरील बाब त्याच्या निर्देशानास आली. त्यांनी तातडीने उपोषणकर्त्या शेतक-याला भेटून त्याचे म्हणणे ऐकून घेत याबाबत तातडीने योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन देत त्या शेतक-यास उपोषण स्थळावरून तहसील कार्यालयात घेऊन आले. या नंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम होताच औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी व संबंधित प्रशासनातील अधिकारी, उपोषणकर्त्या शेतक-याला घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट नागरसोगा येथील शेतीचा बांध गाठला. यावेळी सदरील रस्ता नकाशावरील पाहाणी केल्यानंतर याबाबत तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना तातडीने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दिल्या. त्यानंतर उपोषण मागे घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या