औसा : औसा तालुक्यात झालेल्या वादळी वा-यासह पावसात ऊस आडवा पडला असून यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांंचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशननानिमित्त आमदार अभिमन्यू पवार हे मुबई येथे होते.अधिवेशन संपताच त्यांनी मतदारसंघ गाठून दि.१० सप्टेंबर रोजी नुकसान झालेल्या ऊसाची पाहाणी केली.
शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात अगदी शेतीच्या बांधावर भेटणारे आमदार म्हणून परिचित असलेले आमदार अभिमन्यू पवार हे शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कायम तत्परता दाखवत असतात. आशात विधिमंडळ अधिवेशनात मुंबई येथे असताना मतदारसंघात वादळी वा-यासह पावसाने ऊसाचे नुकसान झाल्याची माहिती कळताच मुंबई येथे नुकसानीची माहिती राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांना देऊन तातडीने मतदारसंघ गाठून थेट ऊसाच्या फडात जाऊन त्यांनी ऊस नुकसानीची पाहणी केली.
मतदारसंघातील नागरसोगा(ता.औसा) येथील शेतकरी कमलाकर सूर्यवंशी, फुलचंद शिंदे, भास्कर सूर्यवंशी, खंडू बेडगे नागनाथ शिंदे यांच्या शेतात जाऊन आडवा पडलेल्या उसाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन नुकसानीचे पंचनामे करून ऊस उत्पादक शेतक-याना एनडीआरएफ व एसडीआरएफमधून मदत मिळवून देण्याची विनंती केली आहे.
तर ऊस उत्पादक शेतक-याचे झालेले नुकसान लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी ते लवकरच त्यांची भेट घेणार आहेत. ऊसाचे झालेल्या नुकसान पाहणी वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता, पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार, बाळासाहेब कुलकर्णी व शेतकरी उपस्थित होते.
कोरोनाने १० हजाराचा टप्पा ओलांडला