24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरहर घर तिरंगा यात्रेत आमदार पवार सहभागी

हर घर तिरंगा यात्रेत आमदार पवार सहभागी

एकमत ऑनलाईन

औसा : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत उजनी (ता.औसा) येथे दि. १२ ऑगस्ट रोजी काढण्यात आलेल्या हर घर तिरंगा रॅलीत एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी औसा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र तयारी उत्साहात सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून उजनी येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या उपस्थितीत या रॅलीत माहात्मा गांधी इंग्लिश स्कूल, गणेश विद्यालय, जिल्हा परिषद प्रशाला येथील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

या रॅलीत भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, सरपंच युवराज गायकवाड, उपसरपंच योगीराज पाटील, भाजपचे तालुका सचिव चंद्रकांत ढवण, श्रीरंग वळके, प्रविण कोपरकर, मजहर पठाण,डॉ. सुभाष ढवण, धनराज लोखंडे,धनराज पाटील, गोंिवद मदने, रमेश वळके, संजय रंधवे, मधुकर रंधवे, शेखर चव्हाण, दिपक वळके, बाळकृष्ण कदम, काशीनाथ सगट,भागवत सगर, सुरेश रेखणे, प्रदीप रणखांब माजी स्वतंत्र सैनिक बशीर शेख, आयुब रुईकर, हरि वळके,तुराब देशमुख, बालाजी सुर्यवंशी, राहूल रोंगे, श्रीकृष्ण जगताप, मारुती टिपे, निळकंठ शिंदे, उमेश चव्हाण, दत्ता भोसले, प्रभाकर ढवण, नामदेव जाधव, अ‍ॅड भाऊराव सगट,राम ढवण, गोपाळ वळके, डॉ. रेवणसिद्धी देवणीकर,रवि जोशी, बादल क्षीरसागर, माहात्मा गांधी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका आशा ओझा, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वतंत्र सैनिक बाबुराव चव्हाण, सैन्य दलातील अधिकारी कॅप्टन राहूल सावळकर यांच्या कुटुंबीयांतील आई रंजना सावळकर, वडील नवनाथ सावळकर यांचे आमदार अभिमन्यू पवार यांनी घरी जावून हार, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या