औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने संभाव्य मार्गाबाबत चर्चा करण्यासाठी औसा येथील कार्यालयात भेट दिली होती. सध्या रेल्वे विभागाच्या विचाराधीन २ पर्याय असले तरी तिसरा पर्याय असू शकतो का अशी विचारणा सुरेश जैन यांनी केली. त्या अनुषंगाने दि. २६ नोव्हेंबर रोजी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी फोनवर संक्षीप्त चर्चा केली. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी आमदार पवार यांना १५ डिसेंबर नंतर दिल्लीला बोलाविले आहे.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान लातूर व औसा येथील एमआयडीसीचे महत्व विषद करून विचाराधीन असलेल्या २ मार्गांव्यतिरिक्त लातूर-औसा- लामजना- निलंगा -कासारसिरसी-उमरगा-आळंद- गुलबर्गा या तिस-या पर्यायाचाही विचार करण्याची विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी पियूष गोयल यांना केली आहे. याबाबत सविस्तर चर्चेसाठी १५ डिसेंबर नंतर दिल्लीला येण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी आमदार पवार यांना दिले आहेत. १५ तारखेच्या नंतर रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन तिस-या पर्यायाचाही विचार करण्याची लेखी विनंती करणार असल्याची माहिती आमदार पवार यांनी एकमतला दिली आहे.
पूरक व्यवसायासाठी लवकर अभ्यास दौरा
मराठवाडा मेट्रो कोच फॅक्टरी, लातूर या मुख्य कारखान्याला पूरक व्यवसाय लातूर जिल्ह्यात विकसित व्हावे यासाठी जिल्ह्यातील निवडक उद्योजकांना सोबत घेऊन रायबरेली, वाराणसी आणि कपूरथला येथील मुख्य कारखाना व संलग्न उद्योगांचा अभ्यास दौरा करण्याचा मानस यापूर्वीच मी जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करणार आहे.
-आमदार अभिमन्यू पवार
२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी