18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरआ. रमेश कराड जिल्हा बँकेचे मतदार म्हणून राहण्यास अपात्र

आ. रमेश कराड जिल्हा बँकेचे मतदार म्हणून राहण्यास अपात्र

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करÞण्यात आली असून, त्यात रमेश कराड यांचे नाव धन्वंतरी वैद्यकीय कर्मचारी पतसंस्थेतून मतदार प्रतिनिधी म्हणून समाविष्ट करण्यात आले होते. त्याला राम शिंदे, क्षीरसागर यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला. त्या अर्जावर सुनावणी होऊन आ. रमेश कराड यांना जिल्हा बँकेत मतदार म्हणून अपात्र ठरविण्यात आले आहे. यासंबंधीचा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी दिला.

दरम्यान, रमेश कराड यांनी यापूर्वीच २५ मार्च २०१९ रोजी संस्थेचे कर्मचारी म्हणून राजीनामा दिला होता. तसेच सरस्वती विद्यालय रामेश्वर या शाळेतून स्वेच्छा निवृत्ती घेतलेली होती. शिवाय पेन्शनही उचलली असताना कर्मचारी म्हणून पतसंस्थेचा सभासद राहू शकत नाही. असा मुद्दा आक्षेपदार यांनी पुराव्यासह मांडला. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी तो आक्षेप मान्य करत आमदार रमेश कराड यांचे जिल्हा बँकेच्या मतदार यादीत असलेले नाव अपात्र ठरविण्यात येते असल्याचा निर्णय बुधवारी दिला.

आमदार रमेश कराड यांनी ३१ मार्च २०१९ रोजी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली असताना ते पुन्हा संस्थेचे कर्मचारी होऊ शकत नाहीत. तसेच धन्वंतरी पतसंस्थेच्या उपविधी तरतुदीनुसार सेवेत कायम कर्मचारी असेल, तरच तो सभासद राहू शकतो, अशी उपविधी क्रमांक ड ११ अशी तरतूद आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मतदार प्रतिनिधीसाठी जानेवारी २०२१ मध्ये अर्ज मागवले होते. त्यावेळी रमेश कराड संस्थेचे कर्मचारी म्हणून सेवेत नव्हते. कर्मचारी नसतानाही धन्वंतरी कर्मचारी पतसंस्थेने ठराव घेतला आहे, हे बेकायदेशीर आहे, असा आक्षेप अर्जदार राम शिंदे क्षीरसागर यांनी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे घेतला होता. तो निर्णय मान्य करून आमदार रमेश कराड यांचे जिल्हा बँकेतील मतदार यादीतील नाव घेण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे, असा निर्णय निवडणूक अधिकारी यांनी दिला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या