21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home लातूर आमदारांनी केली नुकसानीची ट्रॅक्टरव्दारे पाहणी

आमदारांनी केली नुकसानीची ट्रॅक्टरव्दारे पाहणी

एकमत ऑनलाईन

निलंगा : अतिवृष्टीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगात शेतक-यांना आर्थिक मदत तर मिळालीच पाहिजे पण याबरोबर त्यांना मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दि.१८ ऑक्टोबरला नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करताना यलमवाडी (ता. निलंगा) येथील शेतक-यांनी आपल्या शेतीमधील झालेल्या नुकसानीची व्यथा आमदार अभिमन्यू पवार यांच्या समोर मांडून याची पाहाणी करण्याची विनंती केली. यावेळी तेरणा काठावरील या शेतात पाहणीसाठी ट्रॅक्टरशिवाय इतर वाहन जात नसल्याने आमदारांनी ट्रॅक्टरव्दारे जऊन नुकसानीची पाहाणी करीत शेतक-याना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सरकारला मदत देण्यास आपण भाग पाडू असे सांगून धीर दिला.

कुठे रस्ते वाहून गेले, कुठे पुल खचून गेले तर कुठे चक्क जमीन वाहून गेली आहे. अतिवृष्टीने प्रचंड हानी झाली असून या अनुषंगाने त्यांना धीर देण्यासाठी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याच्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा मतदारसंघातील व निलंगा तालुक्यातील शिवारात कुठे चिखल तुडवत,कुठे ट्रॅक्टरव्दारे तर कुठे दुचाकीने जाऊन पाहाणी केली. शेतक-यांकडून झालेल्या नुकसानीची व्यथा ऐकून घेतल्या. यामध्ये यलमवाडी (ता.निलंगा) येथील पाडुरंग तोष्णीवाल या शेतक-यांनी तेरणा काठावरील आपल्या शेतीतील सोयाबीन व शेततळे याचे प्रचंड नुकसान झाल्याची व्यथा मांडली. तेरणा काठावर शेती असल्याने पाहाणीस जाण्यासाठी पायी शक्य नसल्याने आमदारांनी चक्क ट्रॅक्टरव्दार पाचशे मिटर जाऊन या नुकसानची पाहाणी केली.

यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतक-यांंना धीर देत आपण सरकारला मदत देण्यासाठी भाग पाडू पर्यायी रस्तावर उतरायची वेळ आली तर रस्त्यावर उतरू अशी ग्वाही आमदार पवार यांनी दिली.

तो शब्द अपमानजनक नाही – कमलनाथ यांची स्पष्टोक्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या