33.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home लातूर मुख्य रस्ता खुला करण्यासाठी मनसेचे ठिया आंदोलन

मुख्य रस्ता खुला करण्यासाठी मनसेचे ठिया आंदोलन

एकमत ऑनलाईन

रेणापूर : लातूर-आंबाजोगाई राष्ट्रीय महामार्ग ५४८- बी , या रस्त्याचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली परंतु रेणापूर फाट्याजवळील उच्च दाब वाहिनीच्या तारा रोडवरून गेल्याने अवजड वाहनांना रोडवरून ये -जा करता येत नाही, त्यामुळे बाजूच्या खड्डे पडलेल्या रस्त्याचा वापर करावा लागतो. १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजना करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा रेणापूर तालुका मनसेच्या वतीने देण्यात आहे. या प्रकरणी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

सध्या बाजूच्या शेतातून काढलेल्या रस्त्यावरून वाहने न्यावी लागत असल्यामुळे अनेक जीवघेणे अपघात झाले आहेत . त्यात कांहीना जीवही गमवावा लागला. या सर्व बाबी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधीत महामार्ग अधिका-यांच्या लक्षात आणून दिल्या, अनेकवेळा पत्रव्यवहारही केला, प्रत्यक्ष भेटून चर्चा केली परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही बाब लक्षात अल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने २८ ऑगष्ट २०२० रोजी सबंधीत अधिकारी , जिल्हाधिकारी ,तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन ३१ ऑगष्ट रोजी रेणापुर फाट्यावरील डायव्हर्शन खडयामधे बसून अंदोलन करण्यात आले.

अंदोलन चालू असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गायकवाड यानी सबंधित रस्ता १५ सप्टेंबर पर्यंत चालू करून सर्व वाहने मुख्य रस्त्यांने जाण्यासाठी खुल्ला करून देण्याचे लेखी पत्र दिले . त्यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. १५ सप्टेंबरपर्यंत जर हे काम पूर्ण नाही झाले तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा ईशारा देण्यात आला आहे .
या आंदोलनात मनसेचे भागवतराव शिंदे, बाळासाहेब मुंडे, वाहीद शेख, ज्ञानेश्वर जगदाळे, ऋषीकेश माने, श्रीपाल बस्तापुरे, बालाजी घुले, राम शेवाळे, गोंिवद मुंडे, बिभीषन मुंडे, बबलू यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

रेस्टाँरट सुरु करण्याची परवानगी द्या ! -खा.सुप्रीया सुळे यांची मागणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या