21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeलातूरचापोली येथे मनसेचे तीव्र रास्ता रोको आंदोलन

चापोली येथे मनसेचे तीव्र रास्ता रोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली येथे राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरंिसंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली चाकूर पंचायत समितीतील भ्रष्टाचाराविरोधात व ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीत शेतक-यांना गोठा, विहिरी, शौचालये मंजुरीसाठी आर्थिक मागणी होत आहे व हस्तकांमार्फत फाईली मागवून देवाण-घेवाण झाली तरच मंजुरीची सही होत आहे. यावर तात्काळ कार्यवाही होईल, असे गटविकास अधिका-यांंनी आठवड्याापूर्वी मनसे शिष्टमंडळाला अश्वासित करूनही कार्यवाही होत नाही.

त्यामुळे बुधवारी रास्तारोको आंदोलन करून झोपलेल्या अधिका-याना जागृत करीत आहोत, असे डॉ भिकाणे यांनी सांगितले. तसेच तिबार पेरणी, गोगलगायी, अतिवृष्टीमुळे शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी यासाठी निवेदने देऊनही पंचनाम्या पलीकडे सरकारने अद्याप कुठलीही मदत केली नाही. त्यासाठीही रस्त्यावर उतरून हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तालुकाउपाध्यक्ष तुळशीदास माने, चापोली शाखाध्यक्ष बसवराज होनराव, कृष्णा गिरी, राजकुमार हादवे, शंकर पाटील, चंदू मल्लीशे, मालू कोरे, दगडू शेवाळे , नागेश माने, रोहण सलगर, चंद्रकांत सूळ, अजय सुरनर, रामेश्वर देवकते, राज होनराव, शेतकरी माधव, कोटबळे ,संग्राम होनराव, सुधाकर शंकरे, विरभद्र स्वामी, निळकंठ होनराव, अंतेश्वर होनराव, शेषेराव तेलंगे, सुभाष श्रीमंगले, जिलानीभाई शेख, विजय शंकरे आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या